मुंबई, 11 ऑगस्ट : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackey) यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणार, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, असं सांगून शिवसेनेतून बाहेर पडलेले बंडखोर आमदार आता मंत्री झाले आहे. मात्र, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या मंत्र्यांनी शिवतीर्थावर येऊन बाळासाहेबांचे दर्शनंही घेतले नाही. त्यामुळे शिवसेनेकडून टीका होत होती. अखेर आज सकाळी शिंदे गटाचे सर्व मंत्री शिवतीर्थावर पोहोचले. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. शिंदे गटाकडून एकूण 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ मैदानावर वंदन करण्यासाठी कोणताही मंत्री पोहोचला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली होती. अखेर आज शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, संजय राठोड, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. आम्हाला अजूनही खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे अजून कामकाज सुरू झाले नाही. मुख्यमंत्री शिंदे हे भर पावसामध्ये शिवतीर्थावर आले होते. त्यामुळे आमची निष्ठा ही बाळासाहेबांसोबतच आहे. किशोरी पेडणेकर या आमच्याच जिल्ह्याच्या आहे. त्यांनी काय टीका केली, याबद्दल मला काही बोलायचे नाही. त्यांना काही सांगितलं असेल तर आम्ही त्यावर बोलणार नाही, असं प्रत्युत्तरही केसरकरांनी दिलं. ( ‘साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला’; वीणा जगतापचा पारंपारिक LOOK ) ‘ज्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पदभार स्विकारला होता, त्यावेळी शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आले होते. आम्ही आता पदभार स्वीकारल्यानंतर आता आम्ही इथं आलो आहोत. त्यांना नमक करण्यासाठी इथं आलो आहोत, त्यांचा आशिर्वाद घेतल्यानंतर कामाला लागणार आहे, असं केसरकर म्हणाले. ( कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मेथीचाही होतो उपयोग; इतक्या आजारांवर आहे फायदा ) ‘संध्याकाळपर्यंत दालनाचे वाटप होणार आहे. मंत्रालयात दालनचे वाटप न झाल्यामुळे तिथे जाऊन आम्ही काही काम करणार नाही, आज खातेवाटप जाहीर होणार आहे, अशी माहितीही केसरकरांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.