अहमदनगर, 10 फेब्रुवारी : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पोखरी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापाने अवघ्या 11 दिवसांच्या बाळाचा गळा आवळून जीव घेतला आहे. दरम्यान हे बाळ दिव्यांग असल्याने बापाने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. मुलाच्या आजीने याबाबत फिर्याद दिली असून पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. वडील अक्षय रामदार सुपेकर याला अटक करण्यात आली आहे.
सुपेकर याचा विवाह पोखरी येथील प्रियांका यांच्यासोबत झाला होता. यापूर्वी त्यांना एक मुलगी आहे. दुसऱ्या बाळंतपणासाठी त्याची पत्नी माहेरी आली होती. रुग्णालयात प्रसुती होऊन तिने मुलाला जन्म दिला. मात्र, त्यांना दुसरा मुलगा झाला. परंतु त्या मुलाचा एक कान लहान होता. तर तोंड थोडे वाकडे झाल्यासारखे आणि डोळा बारीक दिसत होता. ही गोष्ट आरोपी सुपेकर याला खटकत होती. रुग्णालयात घरी पाठवल्यानंतर पत्नी प्रियांका माहेरी पोखरी येथे असाताना सुपेकर तेथे आला.
हे ही वाचा : बोलण्यात गुंतवून तरुणासोबत भयानक कांड; बीड हादरले, फरार आरोपींचा शोध सुरू
त्यानंतर उपचार करण्यासाठी नेतो, असे सांगून तो बाळाला काही वेळासाठी बाहेर घेऊन आला. काही वेळात बाळासह परत आला. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला सांगितले की, आपले बाळ दिव्यांग होते, त्याचा पुढे आयुष्यभर सांभाळ करताना त्रास झाला असता. त्यामुळे मी त्याला गळा दाबून मारले आहे. हे ऐकून पत्नीने हंबरडा फोडला. आरडाओरड ऐकून शेजारचे लोकही जमले.
मृत बाळ पाहून लोकांनी पोलिसांना संपर्क केला आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुपेकर याला ताब्यात घेतले. त्याची सासू मंदाबाई भास्कर पवार (वय ५२, रा. पोखरी, ता. पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपेकर याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
आठ फेब्रुवारीला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आरोपी सुपेकर मोटारसायकलवर आला. जेवण केल्यावर साडेबारा वाजता मुलाला पत्नीकडून घेतले. फिरवून आणतो असे सांगुन बाळाला सोबत घेऊन मोटरसायकल निघून गेला. त्यानंतर २० ते २५ मिनिटांनी पुन्हा बाळाला घेऊन घरी परत आला.
पत्नी प्रियंकाला सांगितले की, आपले बाळ दिव्यांग असल्याने त्याचे भविष्य खूप वाईट आहे. त्याचा सांभाळ करणे पुढे भविष्यात कठीण होईल. यामुळे मी त्याचा गळा आवळून त्याला ठार मारले. त्यांचे हे बोलणे त्याची सासू मंदाबाई यांनी ऐकले.
हे ही वाचा : धक्कादायक! पती चक्क मित्र आणि प्राण्यांशी संबंध ठेवायचा, पत्नीन व्हॉट्सअॅप चॅट पाहिल अन्..
त्यांनी बाळाला पाहिले असता त्याचा श्वासोश्वास बंद पडलेल्याचे आढळून आले. त्याची हालचाल बंद पडल्याचे पाहून मायलेकी जोरात हंबरडा फोडला. त्यांचा आवाज ऐकून गल्लीतील लोक जमा झाले. त्यानंतर कोणीतरी पोलीसांना माहिती दिल्याने पोलीस घरी आले. त्यांनी बाळाची पाहणी करुन अक्षय सुपेकरला ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक घनश्याम बळप व उपनिरीक्षक विजय ठाकूर तपास करीत आहेत.