Home /News /maharashtra /

शरद पवार आणि गोपीचंद पडळकर आमने-सामने येणार? चौंडी येथे राष्ट्रवादी-भाजप संघर्षाची चिन्हे

शरद पवार आणि गोपीचंद पडळकर आमने-सामने येणार? चौंडी येथे राष्ट्रवादी-भाजप संघर्षाची चिन्हे

शरद पवार आणि गोपीचंद पडळकर आमने-सामने येणार? चौंडी यथे राष्ट्रवादी-भाजप संघर्षाची चिन्हे

शरद पवार आणि गोपीचंद पडळकर आमने-सामने येणार? चौंडी यथे राष्ट्रवादी-भाजप संघर्षाची चिन्हे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथील या जयंती सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

अहमदनगर, 31 मे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांची आज 297वी जयंती आहे. मात्र, या जयंतीला राजकीय रंग लागल्याचं दिसून येत आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगरमधील चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमावरुन आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (BJP vs NCP) असा राजकीय सामना रंगताना दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आज चौंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे सुद्धा चौंडी येथे पोहोचणार आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोप आज चौंडीत होणार आहे. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी शरद पवार आणि गोपीचंद पडळकर हे आमने-सामने येऊन राजकीय संघर्ष होण्याची चिन्ह आहेत. गोपीचंद पडळकरांना ताब्यात घेणार? गोपीचंद पडळकर हे सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. अनेकदा गोपीचंद पडळकर यांनी विखारी टीका केली आहे. त्याच दरम्यान दोन्ही नेते हे चौंडी येथील कार्यक्रमात आमने-सामने येऊन भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच खबरदारी म्हणून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलीस चोंडीला पोहोचण्यापूर्वीच ताब्यात घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. वाचा : आठव्या वर्षी लग्न, 21 व्या वर्षी विधवा नंतर एका निर्णयाने बदललं आयुष्य! वाचा होळकर सम्राज्ञीची कहाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजकारण आणल्याचा आरोप भाजपने केला आहे. आज आमदार गोपीचंद पडळकर श्री क्षेत्र जेजुरी गडावर मल्हारी मार्तंड खंडेरायाचे दर्शन घेतले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून महादेवाला अभिषेक घातला... गोपीचंद पडळकर यांच्यासोबत सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले, खेड तालुक्यात वाफगावचा किल्ला आम्ही अनेक वर्षांपासन मागत आहोत. शरद पवार हा किल्ला फकट वापरत आहेत. होळकरांच्या जमिनी ढापल्या आहेत. तर सदाभाऊ खोत यांनीही टीका करत म्हटलं, चौंडीवर कब्जा करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ahmednagar, Gopichand padalkar, Sharad Pawar (Politician)

पुढील बातम्या