जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मोजक्याच' म्हणत कृषिमंत्री दादा भुसेंच्या मुलाचा सेना खासदाराच्या मुलीशी पार पडला लग्न सोहळा!

'मोजक्याच' म्हणत कृषिमंत्री दादा भुसेंच्या मुलाचा सेना खासदाराच्या मुलीशी पार पडला लग्न सोहळा!

'मोजक्याच' म्हणत कृषिमंत्री दादा भुसेंच्या मुलाचा सेना खासदाराच्या मुलीशी पार पडला लग्न सोहळा!

ज्या फार्म हाऊसवर हा लग्न सोहळा संपन्न झाला त्या फार्म हाऊसच्या वाल कंपाउंडला देखील काळ्या कापडाने झाकण्यात आले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मनमाड, 26 एप्रिल : राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे लग्न सोहळ्याला फक्त 2 तासांची परवानगी देण्यात आली आहे. अशाच परिस्थितीत कृषिमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांच्या मुलाच्या विवाह सोहळा (Wedding ceremony) पार पडला. विवाह सोहळ्यास किती लोकं उपस्थित होते. नियमांचे पालन झाले की नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार (avishkar bhuse) व ठाण्याचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांची कन्या लतीशा (Latisha Vichare) यांचा विवाह सोहळा मालेगावच्या एका फार्मवर पार पडला. विवाह सोहळ्याची अतिशय गुप्तता पाळली गेली असून ’ मोजक्या’ नातेवाईकांव्यतिरिक्त इतर वऱ्हाडी मंडळींना या विवाह सोहळ्यात ‘नो एन्ट्री ’ देण्यात आली होती.

ऊन-पावसाचा खेळ सुरूच; उत्तर कोकण वगळता राज्यात अवकाळीचा इशारा

वर-वधूला आशीर्वाद देण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आले होते. ज्या फार्म हाऊसवर हा लग्न सोहळा संपन्न झाला त्या फार्म हाऊसच्या वाल कंपाउंडला देखील काळ्या कापडाने झाकण्यात आले होते. ‘हापूस’ खरेदी करताय मग एकदा हे वाचाच, देवगडच्या नावाने विकला जातोय कर्नाटकी आंबा तर, गेट पासून सुमारे एक किमी अंतरावर फार्म हाऊसमध्ये काय चालत आहे, याचा थांगपत्ता लागत नसल्याने विवाह सोहळ्यास किती लोकं उपस्थित होते? त्यांनी मास्क घातले होते की नाही? सोशल डिस्टन्सचे पालन झाले की नाही? आलेल्या पाहुणे मंडळींच्या आरोग्य तपासणीची काय होती व्यवस्था? या विवाह सोहळ्याला परवानगी होती आण जर होती तर शासनाने घालून दिलेली बंधनं पाळली का?असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या विवाह सोहळ्यास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली असली तरी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मात्र ऑनलाइन हजेरी लावून वधू-वरास आशीर्वाद दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात