परळी, 31 ऑगस्ट : नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडेंवर (CM Eknath Shinde vs Dhananjay Munde) करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यावरून अप्रत्यक्ष निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या टोलेबाजीला धनंजय मुंडे यांनी परळीत नाथ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमातून अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिलं. राहत इंदोरी यांचा एक शेर धनंजय मुंडे यांनी म्हंटला. माझ्यावर राजकीय, कोव्हिड अशी अनेक संकटं आी, पण तुम्ही माझ्यासोबत आहात, त्यामुळे मी जगात कोणालाच भित नाही, असं मुंडे म्हणाले. राह में ख़तरे भी हैं लेकिन ठहरता कौन है, मौत कल आती है आज आ जाये डरता कौन है ! तेरी लश्कर के मुक़ाबिल मैं अकेला हूँ मगर, फ़ैसला मैदान में होगा कि मरता कौन है !! असं म्हणत धनंजय मुंडे यांनी फटकेबाजी केली. काय म्हणाले होते मुख्यमंत्री? ताट, वाटी चलो गुवाहाटी, अशा घोषणा दिल्या जात होत्या, धनंजय मुंडेही तिकडे होते. धनंजय मुंडे बेंबीच्या देठापासून ओरडून बोलत होते, जसं ते कित्येक वर्षांपासूनचे शिवसैनिक आहेत. तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे. देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखवली, पण परत परत दाखवता येणार नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लगावला होता. मुख्यमंत्र्यांच्या या टोलेबाजीनंतर लगेचच करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या गर्भित इशाऱ्यानंतर धनंजय मुंडे दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणा देताना दिसले नाहीत, त्यामुळे उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.