मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शपथविधी पार पडल्यानंतर कही खुशी कही गम, भाजप कार्यालयातही शुकशुकाट

शपथविधी पार पडल्यानंतर कही खुशी कही गम, भाजप कार्यालयातही शुकशुकाट

ली. पण काही जणांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक जण नाराज आहे. भाजपमध्येही याचा पडसाद उमटले आहे.

ली. पण काही जणांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक जण नाराज आहे. भाजपमध्येही याचा पडसाद उमटले आहे.

ली. पण काही जणांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक जण नाराज आहे. भाजपमध्येही याचा पडसाद उमटले आहे.

    मुंबई, 09 ऑगस्ट : गेल्या महिन्यापासून रखडेला शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. (Maharashtra Cabinet Expansion) शिंदे गट आणि भाजपकडून एकूण 18 जणांनी शपथ घेतली. पण काही जणांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक जण नाराज आहे. भाजपमध्येही याचा पडसाद उमटले आहे. शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. काही वादग्रस्त आणि जुन्या नव्या नेत्यांसह हा विस्तार पार पडला आहे. राजभवनाच्या हॉलमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकूण 18 मंत्र्यांना शपथ दिली. शिंदे गटाकडून अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. सत्तार यांच्यावर टीईटी परीक्षा घोटाळ्याचे आरोप झाले आहे. तर पूजा चव्हाण प्रकरणात आरोप झाल्यानंतरही राठोड यांनी मंत्रिपद दिले. त्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (शिंंदे गटाचं 'मिशन सुरत-गुवाहाटी' फत्ते करणारे रवींद्र चव्हाणांना बक्षीस!) भाजपमध्ये मुंबईतील अनेक नेते इच्छुक होते. पण, जुन्याच नेत्यांचा सहभाग करून नव्या इच्छुकांना डावलण्यात आले आहे. तर शिंदे गटामध्ये अपक्ष आणि मित्र पक्षांनाही संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे बच्चू कडू यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून असलेले संजय शिरसाट यांचाही ऐनवेळी पत्ता कापण्यात आला. त्यामुळे शिरसाट कमालीचे नाराज झाले आहे. औरंगाबादमध्ये एकीकडे भाजपचे नेते जल्लोष करत आहे, तर दुसरीकडे शिरसाट गटामध्ये शुकशुकाट आहे. मुंबईतील भाजप कार्यालयामध्येही फारसा जल्लोष करण्यात आला आहे. अपक्ष आणि मित्रपक्ष नाराज दरम्यान, मंत्रिमंडळात एकाही अपक्ष किंवा मित्र पक्षाला स्थान दिलं गेलं नाही. त्यामुळे अपक्ष आणि मित्रपक्ष नाराज झाले आहे. यावर आता प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले, की 'मी नाराज नाही पण नाराजी सरळ चेहऱ्यावर झळकत आहे. 'अडचण आहे' असं सांगून मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं गेलं नाही. मात्र, सर्व अपक्ष एकत्र आहेत असं समजू नका, असा इशाराही त्यांनी दिला. पुढे ते म्हणाले, की लवकरच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे. कसं आहे मंत्रिमंडळ ? पश्चिम महाराष्ट्र - चंद्रकांत पाटील सुरेश खाडे शंभूराजे देसाई उत्तर महाराष्ट्र - गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील विजयकुमार गावित गुलाबराव पाटील दादा भुसे मराठवाडा - अतुल सावे संदिपान भुमरे अब्दुल सत्तार तानाजी सावंत विदर्भ - सुधीर मुनगंटीवार संजय राठोड कोकण - उदय सामंत दीपक केसरकर मुंबई - रवींद्र चव्हाण मंगलप्रभात लोढा
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या