मुंबई, 3 मे : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, पण या राजीनाम्यावरून आता काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्येच जुंपली आहे. काँग्रेसमध्ये मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झाले असले तरी निर्णय राहुल गांधी घेतात, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर नाना पटोले संतापले आणि त्यांनी संजय राऊत यांना चोमडेपणा न करण्याचा सल्ला दिला. नाना पटोलेंच्या या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांना एवढं गांभिर्याने काय घेताय? त्यांचा पक्ष त्यांना गांभिर्याने घेत नाही, अशी टीका राऊतांनी केली. संजय राऊतांच्या या टीकेवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. तीनही पक्षांची आघाडी आहे, कधी कधी शाब्दिक गोष्टी होत असतात, हा काही गंभीर विषय नाही. पण काँग्रेस पटोले यांना गांभिर्याने घेत नाही, असं म्हणता येणार नाही. नाना पटोले आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तिन्ही पक्षांनी काळजी घेतली पाहिजे, पण आम्ही काही टोकाला जाणार नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. पटोले-राऊतांची चकमक संजय राऊतांनी चोमडेगिरी बंद केली पाहिजे. ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत. गांधी परिवारावर आक्षेप घेणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वावर अविश्वास निर्माण करण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही, म्हणून ही चोमडेगिरी त्यांनी करू नये, हा त्यांना सल्ला आहे, असा निशाणा नाना पटोले यांनी साधला.
राजीनामा शरद पवारांचा, पण जुंपली नाना पटोले-संजय राऊतांमध्ये, महाविकासआघाडीत पुन्हा धुसफूस?#SharadPawar #SanjayRaut #NanaPatole #MahavikasAghadi pic.twitter.com/K58GQethiN
— News18Lokmat (@News18lokmat) May 3, 2023
नाना पटोले यांच्या या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. चाटूगिरी भविष्यात कोण करतंय, हे येणारा काळ ठरवेल. शिवसेनेने कधीही अशाप्रकारची भूमिका घेतली नाही. तुम्ही महाविकासआघाडीमध्ये आहात, आपण आपल्या तोंडावर बंधन घाला. तुमच्या विषयी आम्ही बोलायला लागलो, तर चोमडे कोण आणि चाटू कोण? याचा खुलासा होईल, पण मला त्यांच्याविषयी बोलायचं नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

)







