जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: ऐन तारुण्यात मुलगा देवाघरी गेला; लेकींनीच वृद्ध पित्याला दिला खांदा, करूण कहाणी वाचून पाणवतील डोळे

VIDEO: ऐन तारुण्यात मुलगा देवाघरी गेला; लेकींनीच वृद्ध पित्याला दिला खांदा, करूण कहाणी वाचून पाणवतील डोळे

VIDEO: ऐन तारुण्यात मुलगा देवाघरी गेला; लेकींनीच वृद्ध पित्याला दिला खांदा, करूण कहाणी वाचून पाणवतील डोळे

Bhiwandi News: ऐन तारुण्यात मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आयुष्यभर कष्ट झेललेल्या वृद्ध व्यक्तीला मृत्यूनंतर त्यांच्या लेकींनी खांदा दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भिवंडी, 31 जानेवारी: मुलगा म्हणजे वंशाचा दिवा अन् मुलगी म्हणजे परक्याचं धन या उक्तीप्रमाणे भारतीय समाज आजही वावरतो. असं असताना भिवंडीत मुलगा नसलेल्या एका वृद्ध व्यक्तीला मृत्यूनंतर त्यांच्या मुलींनीच खांदा दिला आहे. ऐन वृद्धापकाळात गरीबीमुळे नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. यामुळे मुलींनी समाजाला चपराक लगावत, आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला आहे. हे दृश्य पाहून उपस्थित असणाऱ्या अनेकांचे डोळे पाणवले होते. गणपत कृष्णा भोईर असं निधन झालेल्या 87 वर्षीय वडिलांचं नाव आहे. ते भिवंडी शहरातील नारपोली भागात आपल्या पत्नी विठाबाई गणपत भोईर यांच्यासोबत वास्तव्याला होते. या भोईर दाम्पत्यास एक मुलगा तर तीन मुली असा परिवार होता. मात्र काही वर्षांपूर्वी डोक्यात ताप शिरल्याने भोईर दाम्पत्याचा 25 वर्षीय मुलगा गणेश वेडसर होऊन मृत पावला. ऐन तारुण्यात मुलगा गेल्याने भोईर दाम्पत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. हेही वाचा- स्टँडवर उभा असताना अचानक चालत्या बसखाली गेला तरुण; थरकाप उडवणारा VIDEO पण त्यांनी परिस्थितीसमोर हार न मानता, काबाडकष्ट करत आपल्या तिन्ही मुली सुषमा, सुलोचना आणि शिल्पा यांना मोठं करून त्यांचे विवाह चांगल्या स्थळी करून दिले. पण कालांतराने कष्ट होत नसल्याने हे वृद्ध दाम्पत्य आपल्या घरीच पडून होते. यावेळी गरीबीमुळे त्यांच्या सर्व नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. अशा स्थितीत तिन्ही मुलींनी आळीपाळीने आपल्या आई वडिलांचा सांभाळ करायला सुरुवात केली. अशात गणपत भोईर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. हेही वाचा- विठुरायाच्या दर्शनाला गेली अन् जीवाचं केलं वाईट,पंढरपुरात तरुणीचा हृदयद्रावक अंत वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांना अग्नी देण्यासाठी नातेवाईकांमधील कोणीही पुढे सरसावलं नाही. त्यामुळे तिन्ही मुलींनींच आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचं ठरवलं. यावेळी त्यांनी काही गावकऱ्यांच्या मदतीने वडिलांच्या तिरडीला खांदा देत, स्मशानभूमीत जाऊन अग्नी देत अंत्यसंस्कार केले आहेत. यावेळी सुलोचना आणि शिल्पा यांनी तिरडीला खांदा दिला होता. तर मोठी बहीण सुषमा यांनी तिरडी समोर शिदोरी धरून स्मशान भूमीत मृतदेहास मुखाग्नी दिला आहे.

जाहिरात

मुलींनी घेतलेल्या या निर्णयाचं उपस्थित सर्वांनी स्वागत करीत मुलगा मुलगी हा भेद मानणाऱ्या आणि स्वार्थासाठी नाती जोपासणाऱ्या समाजाला चपराक लगावल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे. मुलींनी केवळ यावेळी वडिलांवर अंत्यसंस्कारच केले नाहीत. तर त्यांनी वृद्ध आईचा सांभाळ करण्याची शपथ देखील अंत्यसंस्काराप्रसंगी घेतली आहे. हे दृश्य पाहून उपस्थित असणाऱ्या अनेकांचे डोळे पाणावले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात