Home /News /maharashtra /

विठुरायाच्या दर्शनाला गेली अन् जीवाचं केलं वाईट, जयसिंगपुरच्या तरुणीचा पंढरपुरात हृदयद्रावक अंत

विठुरायाच्या दर्शनाला गेली अन् जीवाचं केलं वाईट, जयसिंगपुरच्या तरुणीचा पंढरपुरात हृदयद्रावक अंत

Suicide in Pandharpur: सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या एका तरुणीनं आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे.

    पंढरपूर, 31 जानेवारी: सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर (Pandharpur) याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या एका तरुणीनं आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला (Woman commits suicide) आहे. संबंधित तरुणीनं पंढरपूर नगरपरिषदेच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत (Jump from building) आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना उघडताच जखमी अवस्थेतील तरुणीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण याठिकाणी उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. शैलजा शहापुरे असं मृत पावलेल्या 35 वर्षीय तरुणीचं नाव आहे. रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच मृत तरुणीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. संबंधित तरुणीनं मानसिक त्रासातून आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा-राज्यात भीषण अपघात; लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, 5 जणांचा मृत्यू पोलिसांनी मृत तरुणीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितलं की, मृत शैलजा ह्या गेल्या काही काळापासून मानसिक आजाराने त्रस्त होत्या. यामुळे सांगलीतील मानसोपचार तज्ज्ञांकडून तिच्यावर उपचार देखील करण्यात येत होते. दरम्यान, रविवारी शैलजा या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमधील एका सोनाराच्या दुकानात सोनं मोडायचं असल्याबाबत केवळ चौकशी केली. हेही वाचा-आपल्या आईची हत्या करणाऱ्यासोबतच महिलेनं केली मैत्री; कारण वाचून व्हाल थक्क दरम्यान, पालिकेच्या इमारतीचं शटर उघडं असल्याने त्यांनी तिसऱ्या मजल्यावर प्रवेश केला आणि कोणाला काही कळायच्या आत त्यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. या दुर्दैवी घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. यावेळी आसपासच्या लोकांनी शैलजा यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी उपचार सुरू असताना, त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत शैलजा यांच्या वडिलांची चौकशी केली असता, त्यांना कोणावरही संशय नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pandharpur, Suicide

    पुढील बातम्या