जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / घरात घुसून बेदम मारहाण करून तरुणाचा घेतला जीव, बीड हादरलं

घरात घुसून बेदम मारहाण करून तरुणाचा घेतला जीव, बीड हादरलं

रात्री साडेसातच्या दरम्यान राहत्या घरी असताना जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघांनी घरात घुसून त्याला जबर मारहाण केली.

रात्री साडेसातच्या दरम्यान राहत्या घरी असताना जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघांनी घरात घुसून त्याला जबर मारहाण केली.

रात्री साडेसातच्या दरम्यान राहत्या घरी असताना जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघांनी घरात घुसून त्याला जबर मारहाण केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 21 जुलै : बीड (beed) जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी शहरात किरकोळ कारणावरून एका 27 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. तर ही घटना ताजी असतानाच गेवराई (gevarai) शहरात 25 वर्षीय तरुणाचा घरात घुसून तिघांनी गंभीर मारहाण करत खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू शिवराम शिनोरे (वय 28 रा. संजय नगर गेवराई)) असं खून करण्यात आलेल्या मयत तरुणाचे नाव आहे. मयत बाबू शिनोरे हा रात्री साडेसातच्या दरम्यान राहत्या घरी असताना जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघांनी घरात घुसून त्याला जबर मारहाण केली. ( राज्याच्या चिंतेत नवी वाढ,कोल्हापूरमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव,एका महिलेचा मृत्यू ) स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात गेवराई पोलीस ठाण्यात फोनद्वारे माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी गंभीर अवस्थेत असलेल्या बाबू सिनोरे याला, पोलिसांनी तात्काळ गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालय दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी गेवराई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बीड शहरात भरदिवसा तरुणाचा खून झाला होता. पुन्हा काल रात्री खून झाल्याने बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक उरलाय की नाही ? असाच प्रश्न समोर येत आहे. दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून बीड शहरातील खंडेश्वरी भागामध्ये एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. प्राथमिक माहितीवरून नशा करण्याच्या कारणावरून खून झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर खून केल्यानंतर आरोपी तरूण हा घटनास्थळीचं थांबला होता. या घटनेची माहिती कळतात पेठ बीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात