अमिताभ बच्चन यांनी सांगूनही अर्थसंकल्पाच्या भाषणात अजित पवारांनी केली मोठी चूक

अमिताभ बच्चन यांनी सांगूनही अर्थसंकल्पाच्या भाषणात अजित पवारांनी केली मोठी चूक

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. पण या भाषणात अजित पवारांकडून एक मोठी चूक झाली.

  • Share this:

मुंबई, 06 मार्च : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार 06 मार्चला ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प भाषण करताना अजित पवारांनी कविता सादर केली होती. त्यांच्या कवितांना आमदारांकडून दाद मिळाली. पण असं करत असताना अजित पवारांकडून एक मोठी चूक झाली.

अजित पवार यांच्या पहिल्या अर्थसंकल्पी भाषणाबद्दल सत्ताधारीच नव्हे, तर विरोधी बाकांवरही प्रचंड उत्सुकता होती. विधिमंडळात अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात केल्यानंतर अजित पवार यांनी,

'असफलता एक चुनौती है, स्वीकार करो,

क्या कमी रह गई, देखो और सुधार करो'

अशी कविता सादर करताना आव्हानं स्वीकारत राज्याला पुढील वाटचाल करावी लागणार असं म्हटलं होतं. यानंतर पवार यांनी सांगतिलं की ही कविता हरिवंशराय बच्चन यांची आहे. या कवितेबाबत सर्वसामान्यांचीही अशी समजूत आहे कि 'कोशिश करने वालों की हार नहीं होती' ही कविता हरिवंशराय बच्चन यांनीच लिहिली होती. मात्र सत्य काही वेगळंच आहे. ही सुप्रसिद्ध कविता हरिवंशराय बच्चन यांनी नाही तर कवी सोहनलाल द्विवेदी यांनी लिहिली आहे.

ठाकरे सरकारला विदर्भ, मराठवाड्याचा विसर; अर्थसंकल्पानंतर फडणवीसांनी डागली तोफ

महानायक अमिताभ बच्चन यांनी ही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सगळ्यांना माहिती दिली होती. त्यांनी सांगितलं होतं, 'कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती', बर्‍याच लोकांना ही कविता बाबूजींनी लिहिली आहे असंच वाटतं. मात्र ही कविता माझ्या वडीलांनी लिहिलेली नाही. तर या कवितेचे कवी सोहनलाल द्विवेदी आहेत.

अजित पवार यांनी कवितेच्या फक्त दोन ओळी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सादर केल्या.ती पूर्ण कविता अशी आहे.

लहरों से डर कर नौका पार नहीं होती

कोशिश करने वालों की हार नहीं होती

नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है

चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है

मन का विश्वास रगों में साहस भरता है

चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है

आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती

कोशिश करने वालों की हार नहीं होती

डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है

जा जा कर खाली हाथ लौटकर आता है

मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में

बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में

मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती

कोशिश करने वालों की हार नहीं होती

असफलता एक चुनौती है, स्वीकार करो

क्या कमी रह गई, देखो और सुधार करो

जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम

संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम

कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती

कोशिश करने वालों की हार नहीं होती.

स्वस्त घरं, स्थानिकांना नोकऱ्या आणि महिलांना संरक्षण असं आहे ठाकरे सरकारचं बजेट

या कवितेतील ओळींनी अजित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात केली. त्यानंतर अर्थसंकल्पातील पहिला आणि दुसरा टप्पा अजित पवार यांनी विस्तारीत वाचून दाखवला. अखेर सुरेश भट यांच्या कवितेच्या ओळी सादर करून त्यांनी अर्थसंकल्पाचा शेवट केला.

हाच माझा देश, ही माझीच माती,

येथले आकाशही माझ्याच हाती

आणला मी उद्याचा सूर्य येथे,

लावती काही करंटे सांजवाती

Maharashtra Budget : सर्वसामन्यांना मोठा झटका, बजेटनंतर पेट्रोल-डिजेल महागणार

First published: March 6, 2020, 2:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या