मुंबई, 14 एप्रिल : कोरोना (Coronavirus) संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने विविध निर्बंध लादले आहेत. आज रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर अनेक गोष्टींवर बंधने आणली जाणार आहेत. विवाहसोहळ्यातील (Wedding Ceremony) उपस्थितीवरही मार्यादा आणण्यात आल्या असून याबाबतचे शासन आदेश जारी करण्यात आले आहेत.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्याने राज्यभरात अगदी धुमधडाक्यात विवाह सोहळे पार पडले. परिणामी कोरोनाचा प्रसार वाढण्यास मदत झाली. त्यामुळे आता नवीन नियमांनुसार विवाह समारंभ कमाल केवळ 25 लोकांच्या उपस्थितीत साजरे करण्यास परवानगी असेल.
हेही वाचा - राज ठाकरेंनी लिहिलं PM मोदींना पत्र, महाराष्ट्रातील गंभीर स्थिती मांडत केल्या 5 मोठ्या मागण्याकारवाई टाळण्यासाठी कोणते नियम पाळावे लागणार?
1. मंगल कार्यालय किंवा विवाह समारंभ स्थळी अभ्यागतांना सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण करणे आवश्यक असेल, अथवा त्यांनी वैध असणारे आर टी पी सी आर / आर ए टी / तृ एन ए टी / सी बी एन ए ए टी चाचणी नकारात्मक असण्याचे प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक असेल.
2. उपरोक्त पैकी कोणीही लसीकरण केले नसेल अथवा वैध असणारे आर टी पी सी आर / आर ए टी / तृ एन ए टी / सी बी एन ए ए टी चाचणी नकारात्मक असण्याचे प्रमाणपत्र बाळगले नसल्यास सदर तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस 1000 रुपये दंड व आस्थापनेकडून 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल.
3. एखाद्या ठिकाणी गुन्ह्याची पुनरुक्ती होत असल्यास महासाथ ओसरेपर्यंत सदर जागा टाळेबंद करण्यात येईल व तेथे कोणत्याही पद्धतीचे संमेलन / एकत्रीकरण आयोजित करण्यास परवानगी देण्यात येणार नाही.
4. एखादा विवाह समारंभ धार्मिक प्रार्थनास्थळी आयोजित केल्यास उपरोक्त नियमांच्या अधीन राहून त्यासाठी परवानगी देण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.