मनमाड, 05 नोव्हेंबर : दिवाळीच्या सुट्ट्याच्या निमित्ताने चाकरमान्यांनी गावाची वाट धरली आहे. त्यामुळे रेल्वेला मोठी गर्दी झाली आहे. अशा गर्दीतच मनमाड रेल्वे स्थानकावर ( Manmad railway station) सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या डब्याची (Secunderabad Express) कपलिंग तुटल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ही घटना स्थानकावर घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ही घटना घडली आहे. सिकंदराबाद एक्स्प्रेसच्या डब्याची कपलिंग मनमाड रेल्वे स्थानकावर तुटली. गाडी प्लॅटफार्मवर लागत असतांना अचानक कपलिंग तुटली त्यामुळे एकच खळबळ उडाली.
मुहूर्त ट्रेडिंगमध्ये राकेश झुनझुनवालांनी तासाभरात कमावले 101 कोटी!
गाडी प्लॉट फार्मवर लागल्यानंतर मनमाड येथून सिकंदराबादला जाणार होती. सुदैवाने कपलिंग रेल्वे स्थानकावर तुटली. जर गाडी सिकंदराबादकडे जात असताना धावत्या गाडीची त्यावेळी कपलिंग तुटली असती तर मोठा अपघात होऊन अनेकांचा बळी गेला असता. मात्र घटना प्लॉट फार्मवर घडल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
T20 World Cup : तीन बॉलला तीन विकेट, तरी शमीला मिळाली नाही हॅट्रिक! VIDEO
घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेच्या टेक्निशियन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने तुटलेली कापलिंग दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले.
पंधरा दिवसांपूर्वी क्रॉसिंग पॉईंटमध्ये बिघाड झाला होता त्यावेळी तपोवन एक्स्प्रेसची अपघात होता होता वाचला होता. त्यामुळे रेल्वेचा टेक्निशियन विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.