मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : तीन बॉलला तीन विकेट, तरी मोहम्मद शमीला मिळाली नाही हॅट्रिक! VIDEO

T20 World Cup : तीन बॉलला तीन विकेट, तरी मोहम्मद शमीला मिळाली नाही हॅट्रिक! VIDEO

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) अखेर सूर गवसला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध 66 रनने दणदणीत विजय मिळवल्यानंतर स्कॉटलंडचा (India vs Scotland) भारतीय बॉलर्सने फक्त 85 रनवर ऑल आऊट केला.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) अखेर सूर गवसला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध 66 रनने दणदणीत विजय मिळवल्यानंतर स्कॉटलंडचा (India vs Scotland) भारतीय बॉलर्सने फक्त 85 रनवर ऑल आऊट केला.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) अखेर सूर गवसला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध 66 रनने दणदणीत विजय मिळवल्यानंतर स्कॉटलंडचा (India vs Scotland) भारतीय बॉलर्सने फक्त 85 रनवर ऑल आऊट केला.

दुबई, 5 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) अखेर सूर गवसला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध 66 रनने दणदणीत विजय मिळवल्यानंतर स्कॉटलंडचा (India vs Scotland) भारतीय बॉलर्सने फक्त 85 रनवर ऑल आऊट केला. मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि रविंद्र जडेजा यांना प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या, तर जसप्रीत बुमराहला 2 आणि आर.अश्विनला एक विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. भारतीय बॉलर्सनी विराटचा हा निर्णय योग्य ठरवला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विराटने पहिल्यांदाच टॉस जिंकला. याआधी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध विराटने टॉस गमावला होता.

17 व्या ओव्हरच्या पहिल्या तिन्ही बॉलला टीम इंडियाला तीन विकेट मिळाल्या. लागोपाठ तीन बॉलला तीन विकेट मिळाल्या असल्या तरी मोहम्मद शमीची हॅट्रिक मात्र झाली नाही. 17 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला शमीने मॅकलियोडला बोल्ड केलं. यानंतर लगेच साफियान शरीफ दुसऱ्याच बॉलला रन आऊट झाला. तिसऱ्या बॉलला शमीने इव्हान्सला बोल्ड केलं. भारताला तीन बॉलला तीन विकेट मिळाल्या असल्या तरी दुसरी विकेट रन आऊट असल्यामुळे मोहम्मद शमीची हॅट्रिक हुकली.

सेमी फायनलचं समीकरण

पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यामुळे भारताचं सेमी फायनलला पोहोचण्याचं स्वप्न धूसर झालं आहे. पाकिस्तानच्या टीमने आधीच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे, आता न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी स्पर्धा आहे.

टीम इंडियाचे उरलेले सामने स्कॉटलंड (Scotland) आणि नामिबियाविरुद्ध (Namibia) आहेत. भारताचा पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने आणि न्यूझीलंडविरुद्ध 8 विकेटने पराभव झाला. या दोन्ही मोठ्या पराभवामुळे टीम इंडियाचा नेट रनरेट खराब झाला, पण अफगाणिस्तानविरुद्ध 66 रनने विजय झाल्यामुळे भारताचा नेट रनरेट सुधारला. असं असलं तरी टीम इंडियाला उरलेले सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. भारताने पहिले बॅटिंग केली तर त्यांना कमीत कमी 60-70 रनने विजय मिळवावा लागेल. तसंच आव्हानाचा पाठलाग कमीत कमी विकेट गमावून आणि कमीत ओव्हरमध्ये करावा लागेल.

अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवलं आणि भारताने उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या, तर तिन्ही टीमच्या खात्यात प्रत्येकी 6-6 पॉईंट्स असतील, त्यामुळे ज्या टीमचा नेट रनरेट चांगला असेल त्यांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश होईल.

First published:
top videos

    Tags: T20 world cup, Team india