नितेश राणे फरार, आता गोव्यातही शोध सुरू; जामिनासाठी हायकोर्टात धाव
नितेश राणे फरार, आता गोव्यातही शोध सुरू; जामिनासाठी हायकोर्टात धाव
आमदार नितेश राणे सलग पाच दिवसांपासून गायब असून ते गोव्यात लपले असल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत. दरम्यान, राणेंच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.
मुंबई, 3 जानेवारी: शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी (Attack) प्रमुख संशयित असणारे आमदार नितेश (Nitesh Rane) राणे पाच दिवसांपासून फरार (absconded) आहेत. महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) आणि सिंधुदुर्ग पोलिसांचं (Sindhudurga Police) विशेष पथक आमदार राणेंचा शोध घेत आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणेंच्या वतीनं आता मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जामीनासाठी (Bail) अर्ज करण्यात आला आहे. राणे गोव्यात?आमदार नितेश राणे हे गोव्यात लपले असल्याचा संशय पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या विशेष पथकाने गोव्यातही अनेक ठिकाणी सापळा रचल्याची माहिती समोर आली आहे. कणकवली पोलिसांनी सलग तिसरी नोटीस देऊनही नितेश राणे हजर झालेले नाहीत. सलग 5 दिवस ते बेपत्ता आहेत. उच्च न्यायालयात अर्जअटक टाळण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या वतीनं सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर आता राणेंच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. आमदार राणे यांनी त्यांच्या वकिलांमार्फत हा अर्ज दाखल केला आहे. त्यावर मंगळवारी तातडीची सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे वाचा- Arihant Capital शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल, वर्षभरात शेअरमध्ये 160 टक्के वाढकाय आहे प्रकरण?शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे. या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत आहे, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टानं राणेंचा जामीन अर्ज फेटाळला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.