जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'आदित्य ठाकरे कोण आहेत?' तानाजी सावंत यांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं सडेतोड उत्तर

'आदित्य ठाकरे कोण आहेत?' तानाजी सावंत यांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं सडेतोड उत्तर

'आदित्य ठाकरे कोण आहेत?' तानाजी सावंत यांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं सडेतोड उत्तर

तानाजी सावंत यांनी ‘आदित्य ठाकरे कोण आहेत? फक्त एक आमदार..अशी टीका काही दिवसांपूर्वी केली होती. यावर आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे

  • -MIN READ Buldana,Maharashtra
  • Last Updated :

उस्मानाबाद 09 नोव्हेंबर : आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तानाजी सावंत हे गद्दार असल्याची टीका त्यांनी यावेळी बोलताना केली. यासोबतच तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेलाही आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तानाजी सावंत यांनी ‘आदित्य ठाकरे कोण आहेत? फक्त एक आमदार..अशी टीका काही दिवसांपूर्वी केली होती. यावर आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी आदित्य उद्धव ठाकरे साधा आमदार असून महाराष्ट्राचा आमदार आहे, असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं. ‘महाराष्ट्रावर हैवानांचं राज्य आलंय, सिल्लोडचा बेडूक सोयीनुसार…’; ठाकरे गटाची अब्दुल सत्तारांवर सडकून टीका डॉक्टर तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे कोण आहेत? मला माहित नाही. ते फक्त आमदार आहेत, एवढंच मला माहिती आहे, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. आदित्य ठाकरे मंगळवारी तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत शेतकऱ्यांची संवाद साधला आहे. यावेळी बोलताना तानाजी सावंत एक गद्दार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे म्हणाले, की मी ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेले पैसे रद्द केले गेले. याच रस्त्याचा त्रास मला झाला. मला वाटलं की रस्त्यावर खेकडे आले की काय? असं वक्तव्य करून आदित्य ठाकरे यांनी तानाजी सावंत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अब्दुल सत्तारांचे कपडे फाडा, अन्… आता राष्ट्रवादीच्या नेत्याचीही जीभ घसरली! आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना शिंदे गटातील आमदारांवरही निशाणा साधला. आदित्य ठाकरे म्हणाले, की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे चाळीस बंडखोर टेबलावर नाचले. टेबलावर नाचणारे राज्यकर्ते मंत्री होऊ शकत नाहीत. बारमध्ये जसे नाचतात तसे हे टेबलावर नाचले, अशी टीका शिंदे गटातील 40 बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात