भास्कर मेहरे, प्रतिनिधी
यवतमाळ, 04 सप्टेंबर : सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून ओळख निर्माण करुन चक्क 02 कोटी रुपयांना दिल्ली येथील एका डॉक्टराची (doctor) फसवणूक झाल्याची घटना यवतमाळ येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच अवघ्या 24 तासांच्या आत गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीकडून रक्कम हस्तगत करण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून यवतमाळ येथील एका तरुणीने दिल्ली येथील नामांकीत डॉक्टरासोबत मैत्री पूर्ण संबंध प्रास्तापित केले. त्यांच्याकडून दोन कोटी रोख रक्कम, मौल्यवान दागिन्यांची भेट स्विकारली आणि त्यांनतर अकाऊंट अचानक बंद केल्याने स्वता:ची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्या डॉक्टराने थेट यवतमाळ गाठत पोलीस अधिक्षक कार्यालत येऊन आपली आपबीती सांगितली. या तक्रारीचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, यवतमाळ व सायबर सेल यांना घटनेची शहानिशा करुन आरोपी निष्पन्न करण्याबाबत निर्देशित केले.
मोदी सरकारला हवीये तुमची एक छोटीशी मदत; 50 हजार रुपयांचं बक्षीसही जारी
त्या अनुषंगाने सायबर सेलच्या चमूने फसवणूक करणारे महिलेची माहिती घेवून तांत्रिक विश्लेषण केले असता डॉक्टरची फसवणूक करणारी महिला नसून तो पुरुष असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक गठीत करुन स्थानिकांनी अरुणोदय सोसायटीतील एका घरी भाड्याने राहणाऱ्या इसमाच्या घरी धाड टाकली असता सदर ठिकाणी आरोपी संदेश अनिल मानकरकडून एक कोटी 72 लाख 7 हजार रुपये नगदी व चार लाख रुपयाचे सोन्याचे दागिने आणि चार विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण 1 कोटी 78 लाख 6 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात यवतमाळ पोलिसांना यश आलं. या प्रकरणातील आरोपी ची चौकशी सुरू आहे.
नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करतांना अनोळखी व्यक्तीवर त्वरीत विश्वास ठेवू नये, नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करतांना सावधगिरी बाळगावी, असं आवाहन यवतमाळ पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Yavatmal