मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /घरातून येत होती दुर्गेंधी, पोलिसांनी दार उघडून पाहिले आणि...

घरातून येत होती दुर्गेंधी, पोलिसांनी दार उघडून पाहिले आणि...

या महिलेचा पती हा या घटनेनंतर फरार झाला असून ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या महिलेचा पती हा या घटनेनंतर फरार झाला असून ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या महिलेचा पती हा या घटनेनंतर फरार झाला असून ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अंबरनाथ, 23 ऑगस्ट : एका बंद घरात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह (dead body) आढळून आल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये (ambarnath) समोर आली आहे. या महिलेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणजे, हत्येनंतर महिलेचा पती फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प 5 गायकवाड पाडा परिसरात एका बंद घरात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह रविवारी रात्री आढळून आला होता.  भागूबाई चाळीत काही दिवसांपूर्वी मृत महिला आणि तिचा पती भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होते, मात्र गेले काही दिवस हे घर बंद होते. शिवाय खोलीतून दुर्गंधी येत असल्याने नागरिक हैराण झाले होते.

भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीकडून मारहाण; पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल

दरम्यान, घर मालकाने नागरिकांच्या मदतीने ताळे तोडून खोलीत पाहिले असता इथे महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह त्यांना आढळून आला, त्यांनी तात्काळ याची माहिती शिवाजी नगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळीची पाहणी करत मृतदेह ताब्यात घेतला आहे.सध्या महिलेचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, भाडेतत्वावर खोली घेण्यासाठी ज्या माणसाने मध्यस्थी केली होती, त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे. तर घर मालकाकडून यासंबंधीची काही माहिती मिळते का याचादेखील पोलीस तपास करत आहेत. या महिलेचा पती हा या घटनेनंतर फरार झाला असून ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तीन महिन्यांनंतर उघडले जगन्नाथ मंदिराचे दरवाजे, पाहा PHOTOs

शिवाय महिलेचा पती फरार असल्याने या महिलेच्या हत्येच्या संशयाची सुई या महिलेचा पतीवर जात आहे. त्यामुळेच तो फरार झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. आता या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले असून ही हत्या आहे की आणखी काय याचा छडा लावून आरोपीला जेरबंद करणे पोलिसां समोर आवाहन असणार आहे.

First published:
top videos

    Tags: Ambernath