Home /News /crime /

भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीने केली मारहाण; पत्नीनेही उचललं धक्कादायक पाऊल

भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीने केली मारहाण; पत्नीनेही उचललं धक्कादायक पाऊल

एका क्षुल्लक कारणावरुन पत्नीला मारहाण केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

    इंदूर, 23 ऑगस्ट : इंदूरमधून (Indore News) गेल्या अनेक दिवसात गुन्हेगारीसंदर्भातील अनेक बातम्या समोर येत आहे. आता तर एका क्षुल्लक कारणावरुन महिलेला मारहाण केल्याचं वृत्त समोर आलं आहे. भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीने पत्नीला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सर्व प्रकारानंतर पत्नीने रागाच्या भरात विष खाल्लं. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी महिलेच्या वक्तव्यानंतर पतीविरोधात मारहाण आणि अत्याचाराची तक्रार नोंदवली आहे. ही घटना शहरातील द्वारकापुरा पोलीस हद्दीतील आहे. लॉकडाऊनमध्ये राजू राजौरेचं काम सुटलं होतं. त्यानंतर घरातील वातावरण बिघडत जात होतं. छोट्या छोट्या गोष्टींवरुन तो पत्नीला मारहाण करीत असे. पोलिसांनी सांगितलं की, ऋषी पॅलेस निवारी महिला रानू राजौरेने सांगितलं की, रविवारी रात्री खाण्यावरुन तिचं पती राजूसोबत वाद झाला. पतीने सांगितलं की, भाजीत कोंथिबीर का नाही टाकली? यावर ती म्हणाली की, कोथिंबीर नव्हती. यानंतर राजू संतापला आणि त्याने पत्नीला मारहाण सुरू केली. यात ती जबर जखमी झाली. काही वेळानंतर पत्नीने विष खाऊ आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जवळपासच्या लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. हे ही वाचा-अंत्यसंस्कार सुरु असतानाच पोहोचले पोलीस, चिता विझवून घेऊन गेले मृतदेह घरखर्चासाठीही देत नव्हता पैसे आरोपी पती महिलेला घर चालविण्यासाठी पैसे देत नव्हता. याशिवाय मुलांची शाळेची फीदेखील भरत नव्हता. सतत मारहाण करीत होता. पोलिसांनी तिच्या वक्तव्याच्या आधारावर पती राजूविरोधात हुंड्यासाठी त्रास देणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Indore News

    पुढील बातम्या