मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बापरे! स्वच्छतागृहात आढळला साडेसहा फुटाचा नाग, पोलिसाची पळता भुई थोडी

बापरे! स्वच्छतागृहात आढळला साडेसहा फुटाचा नाग, पोलिसाची पळता भुई थोडी

नांदेड (Nanded) येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या निवासस्थानातील स्वच्छतागृहात साडेसहा फुटांचा नाग (Snake found in toilet) आढळला आहे.

नांदेड (Nanded) येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या निवासस्थानातील स्वच्छतागृहात साडेसहा फुटांचा नाग (Snake found in toilet) आढळला आहे.

नांदेड (Nanded) येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या निवासस्थानातील स्वच्छतागृहात साडेसहा फुटांचा नाग (Snake found in toilet) आढळला आहे.

नांदेड, 07 जून: नांदेड (Nanded) येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या निवासस्थानातील स्वच्छतागृहात साडेसहा फुटांचा नाग (Snake found in toilet) आढळला आहे. शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास स्वच्छतागृहात हा नाग फणा काढून बसलेला आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या नागाला फणा काढलेलं पाहून पोलिसाची पळता भुई थोडी झाली आहे. रात्री उशीरा सर्पमित्राला बोलावून साडेसहा फुटी नागाला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. वेळीच सतर्क झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेनंतर परिसरात बराच वेळ भीतीचं वातावरण पसरलं होतं.

खरंतर, शहरातील एनटीसी मिलला लागून नांदेड जिल्हा कारागृह आहे. कारागृह परिसरातच अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची जुन्या पद्धतीची शासकीय निवासस्थाने आहेत. महिला पोलीस कर्मचारी पठाण यांच्या निवासस्थानातील स्वच्छतागृहात हा विषारी नाग आढळला आहे. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास वॉशरुमसाठी गेलं असता, सहा फुटांचा हा नाग फणा काढून बसला होता. या सापाला परिसरात एकच घाबरगुंडी उडाली होती.

हे ही वाचा-माहूतच्या मृत्यूनंतर हत्तीलाही कोसळलं रडू; अंत्यदर्शनाचा भावनिक VIDEO आला समोर

स्वच्छतागृहात नाग आढळल्यानंतर पठाण यांनी त्वरित सर्पमित्र भोसले यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर रात्री उशीरा नागाला सुरक्षित बाहेर काढलं आहे. त्यानंतर पठाण कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सर्पमित्र भोसले यांनी सुरक्षित ठिकाणी नेऊन नागला सोडून दिलं आहे.

First published:

Tags: Nanded, Snake