नवी दिल्ली, 05 जून: सोशल मीडियावर (Social media) दररोज लाखो व्हिडिओ व्हायरल (Viral video) होतं असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एक हत्ती आपल्या मालकाच्या निधनामुळे (mahaout death) अत्यंत दुःखी झाला आहे. आपल्या मालकाच्या अंत्यदर्शनाला आल्यानंतर हत्तीच्या डोळ्यातही अश्रूच्या धारा वाहू लागल्याच (Elephant cried) या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आपल्या मालकाच्या निधनामुळे हत्तीला दुःखी झाल्याचं पाहून उपस्थित असणाऱ्या अनेकांना अश्रूंचा बांध आवरता आला नाही. हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं असून अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. खरंतर, पाळीव प्राणी मनुष्यासारखेचं संवेदनशील असतात. त्यांनाही सुख दुःखाचा फरक समजत असतो. हे प्राणी आपल्या मालकाच्या सुख दुःखात साथ देण्यासाठी तत्पर असतात. आपल्या जीवभावाच्या माणसांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर आपल्या जेवढं दुःख होतं. तेवढंच दुःख प्राण्यांना देखील होतं असतं. याचचं हे एक जिवंत उदाहरण आहे. आपल्या माहूताचा झालेला मृत्यू पाहून हत्तीला आपलं दुःख लपवता आलं नाही. या व्हिडीओत तुम्ही पाहु शकता. संबंधित माहूताचा मृतदेह एका ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. यावेळी काहीजण संबंधित हत्तीला माहूताच्या अंतिम दर्शनासाठी घेऊन येतात. यावेळी हा हत्ती बराच वेळ आपल्या मालकाकडे पाहात आहे. त्याचबरोबर आपल्या सोंडेने माहूताला स्पर्श करण्याचा प्रयत्न ही करत आहे. पुढच्या काही क्षणातचं हत्तीच्या डोळ्यातही अश्रूंच्या धारा सुरू झाल्याचं दिसत आहे.
An elephant comes to bid final farewell to his papaan (mahout). pic.twitter.com/VexNAtPwNh
— Nandagopal Rajan (@nandu79) June 3, 2021
हे ही वाचा- कोरोनाबाधित पत्नीला कोविड सेंटरमध्ये नेण्यासाठी पतीची अफलातून शक्कल, पाहा VIDEO हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे, याबाबतची पुष्टी अद्याप होऊ शकली नाही. पण दक्षिणेकडील राज्यातील कुठलातरी राज्यातील असल्याचं सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं असून, अनेकजण यावर भावनिक प्रतिक्रिया देत आहेत.