मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मैत्रिणीला भेटून येणाऱ्या तरुणावर पोलिसाने केला अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ शूट करून केली मागितली खंडणी

मैत्रिणीला भेटून येणाऱ्या तरुणावर पोलिसाने केला अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ शूट करून केली मागितली खंडणी

तरुणावर केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ देखील देवकर यांनी काढला. त्यांनतर सदर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडित तरुणाकडे खंडणी...

तरुणावर केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ देखील देवकर यांनी काढला. त्यांनतर सदर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडित तरुणाकडे खंडणी...

तरुणावर केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ देखील देवकर यांनी काढला. त्यांनतर सदर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडित तरुणाकडे खंडणी...

सांगली, 22 नोव्हेंबर :  एका महाविद्यालय तरुणावर एका पोलीस कर्मचाऱ्याने (islampur police) अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सांगली (sangali) जिल्ह्यातील इस्लामपूर या ठिकाणी समोर आली आहे. पीडित तरुणात अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल करत g केल्याचा प्रकारही घडला असून याप्रकरणी नराधम पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पोलिसांच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचा प्रकार घडला आहे.

इस्लामपूर शहरामध्ये 27 ऑक्टोबर दरम्यान पहाटेच्या सुमारास इस्लामपूर पोलिसांची गस्त सुरू असताना इस्लामपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी हनुमंत देवकर आणि पोलीस कर्मचाऱ्याला एक महाविद्यालयीन तरुण आढळून आला. त्याच्याकडे देवकर यांनी चौकशी केली असता सदर तरुणाने आपल्या मैत्रिणीला भेटून आपल्या वस्तीगृहावर जात असल्याचं सांगितलं. यावर पोलीस कर्मचारी देवकर याने तरुणाला या प्रकरणाबाबत त्याचा व संबंधित तरुणीच्या घरच्यांना सर्व प्रकरण सांगण्याची धमकी दिली आणि सदर तरुणावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसंच, तरुणावर केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ देखील देवकर यांनी काढला. त्यांनतर सदर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडित तरुणाकडे खंडणी देखील मागण्याचा प्रकार घडला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मुंबई हायकोर्टात युक्तीवाद, तोडगा निघाला का?

अखेर या त्रासाला कंटाळून पीडित तरुणाने इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये इस्लामपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी असणाऱ्या हणमंत देवकर (वय 34) याच्या विरोधात अनैसर्गिक अत्याचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी हणमंत देवकर अटक केल्याची माहिती इस्लामपूर पोलीस उपअधीक्षक कृष्णकांत पिंगळे यांनी दिली आहे.

बायकोला दिली प्रेमाची अनोखी निशाणी; PHOTOS पाहून म्हणाल 'वाह ताज'!

या प्रकरणी ३८४,३७७ , ५०४ , ५०६ माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम - ६७ प्रमाणे दिनांक 21 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयातील आरोपी पोलीस कॉन्स्टेबल हणमंत देवकर याला अटक केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पो.नि. शशिकांत चव्हाण , इस्लामपूर पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी पोलीस कॉन्स्टेबल हणमंत देवकरने इस्लामपूर पोलीस ठाणे याचेविरुद्ध पोलीस अधीक्षक, सांगली यांना खात्याअंतर्गत कडक कारवाई होण्याबाबत तात्काळ अहवाल पाठविला जाणार आहे.

First published:

Tags: Sangali, सांगली