Home /News /maharashtra /

चोरी केल्याच्या संशयावरून अकोला शहरात मध्यरात्री दगडाने ठेचून एकाची हत्या

चोरी केल्याच्या संशयावरून अकोला शहरात मध्यरात्री दगडाने ठेचून एकाची हत्या

Akola murder Case : हत्येतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

अकोला, 8 मार्च : अकोला शहरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमार खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क जवळ 35 वर्षीय इसमाची चोरीच्या संशयावरून दगडाने ठेचून हत्या (Akola Murder) करण्यात आली आहे. हत्येतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले (Accused arrested by police) असून पुढील तपास सुरू केला आहे. अकोला शहरात गुन्हेगारी आपले डोके वर काढत आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी वृत्ती ही पोलिसांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. पोलीस आपले कर्तव्य चोखपणे बजावत असले तरी गुन्हेगारी थांबायचे नाव घेत नाही. काल मध्यरात्रीच्या सुमारास अकोल्यातील नेहरू पार्क चौका जवळ दगडाने ठेचून एका इसमाची हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या 35 वर्षीय इसमाचे नाव श्याम शंकर घोडे असून हा इसम खदान परिसरातील सरकारी गोडाऊन मागे राहत होता. श्याम घोडे हा गवंडी काम करीत असल्याची माहिती प्राप्त होत आहे. रात्रीच्या सुमारास आरोपीनी दगडाने ठेचून श्याम घोडे याची हत्या करून फरार झाला. घटनास्थळी दोन चिलम व रक्ताने माखलेले दगड आढळून आल्याने ही हत्या व्यसनाच्या नशेत करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस घटनस्थिळी दाखल होऊन जागेचा पंचनामा करून मृतदेह रात्रीच शवविच्छेदनासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. हेही वाचा - मॉब लिंचिंगने देश पुन्हा हादरला! तरुणाला रात्रभर मारहाण; सकाळी मृत्यू हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी आठ तासात ताब्यात घेतले. हत्येचे नेमक्या कारणाचा तपास करत असताना श्याम घोडे हा चोरीच्या उद्देशाने आला असल्याचा संशय आल्याने त्याची दगडाने ठेचून हत्त्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी खदान पोलिसांनी नेहरू चौक स्थित फुटपाथवर दुकान लावणाऱ्या सुमित शर्माला या 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या हत्येमध्ये आणखी किती जण सामील होते आणि यामागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. अकोल्यातील वाढती गुन्हेगारी थांबवण्यासाठी आता पोलिसांना कडक पाऊले उचलण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया आता सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Akola, Akola News, Murder

पुढील बातम्या