बेळगाव, 16 डिसेंबर : कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर वाद एकीकडे मिटवण्यात आला आहे. पण दुसरीकडे दिल्लीत बैठक झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत बेळगावमध्ये कर्नाटक सरकारच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना झाली होती. पण चालकानेच दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे उघड झालं आहे. बेळगाव सीमावाद मिटवण्यासाठी नवी दिल्लीत खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. पण, बैठक होऊन 24 तास होत नाही तेच बेळगावमध्ये अज्ञातांनी कर्नाटक सरकारची गाडी फोडली असल्याचे समोर आले. अधिवेशनाच्या कामासाठी ही गाडी आली होती. हलग्याजवळ गाडीवर 5 अज्ञात व्यक्तींची दगडफेक केली असल्याचे सांगितले जात होते. (महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पंतप्रधानांनी लक्ष घालावं, उदनयराजेंचा भाजपला घरचा अहेर?) पण गाडीवर दगडफेक झाल्याचा बनाव उघड झाला आहे. दारूच्या नशेत गाडीचा अपघात करून चालकाने बनाव केला होता.बंगळुरूहुन बेळगावात येत असलेल्या शासकीय वाहनाची काच फुटली होती. कन्नड आणि मराठी संघटनांच्या वादाचा फायदा उठवत हा बनवा रचला होता, असं पोलीस तपासात उघड झाला आहे. (संजय राऊतांचा दौरा अन् नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; 12 माजी नगरसेवक शिंदे गटात) विशेष म्हणजे, कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादावर दिल्लीत अखेरीस तोडगा काढण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली, याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. ही बैठक सकारात्मक झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं, तसंच या बैठकीत झालेल्या निर्णयांबाबतही अमित शाह यांनी माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.