जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महिलेच्या तक्रारीमुळे आमदार सुरेश धस यांच्यासह 38 समर्थकांवर गुन्हा दाखल, बीडमध्ये एकच खळबळ

महिलेच्या तक्रारीमुळे आमदार सुरेश धस यांच्यासह 38 समर्थकांवर गुन्हा दाखल, बीडमध्ये एकच खळबळ

महिलेच्या तक्रारीमुळे आमदार सुरेश धस यांच्यासह 38 समर्थकांवर गुन्हा दाखल, बीडमध्ये एकच खळबळ

अनेक वेळा तक्रार देऊन देखील प्रशासन कारवाई करत नसल्याचे सदर महिलेने थेट गृहमंत्री यांना पत्र लिहिले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 24 जुलै : बीडमध्ये (beed) आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांना जबर धक्का बसला आहे. सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी (ashti police station)  सुरेश धस यांच्याविरोधात ही कारवाई केली आहे. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. माधुरी मनोज चौधरी (madhuri chodhari) असं तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमदार सुरेश धस यांच्या विरुद्ध निवडणुकीत उभे असल्याचा राग मनात धरून सुरेश धस आणि त्यांच्या समर्थकांनी हॉटेल आणि स्थानिक संपत्तीची तोडफोड केल्याचा आरोप माधुरी चौधरी यांनी केला आहे. माधुरी चौधरी यांनी  दिलेल्या तक्रारीवरून आष्टी पोलिसात आमदार सुरेश धस यांच्यासह तब्बल 38 समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Candida auris चे रुग्ण आढळल्यानं खळबळ; उपचारही उपलब्ध नसल्यानं चिंता वाढली

2017 साली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली होती. या निवडणुकीत सुरेश धस यांच्या पॅनलच्या विरोधात पांढरी येथील माधुरी चौधरी ह्या निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. याचाच राग मनात धरून सुरेश धस आणि त्यांचे समर्थक पती मनोज चौधरी यांच्यावर खोट्या तक्रारी देऊन मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. पुराच्या पाण्यासोबत नवं संकटही आलं वाहून; रस्त्यावर मगर फिरतानाचा VIDEO व्हायरल अनेक वेळा तक्रार देऊन देखील प्रशासन कारवाई करत नसल्याचे सदर महिलेने थेट गृहमंत्री यांना पत्र लिहिले होते. 19 जुलैच्या रात्री सुरेश धस आणि त्यांचे समर्थक पांढरी येथे पोहोचले आणि पीडित महिलेच्या संपत्तीची तोडफोड केली अशी तक्रार महिलेने केली आहे. त्यानुसार, आष्टी पोलिसात आमदार सुरेश धस यांच्यासह तब्बल 38 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुरेश धस यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात