मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आपलं रक्षण करणाऱ्या पोलिसाला 6 तरुणांनी केली बेदम मारहाण, घटना CCTVमध्ये कैद

आपलं रक्षण करणाऱ्या पोलिसाला 6 तरुणांनी केली बेदम मारहाण, घटना CCTVमध्ये कैद

कर्तव्य निभावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा संपूर्ण देश आणि सर्व समाजघटक गौरव करीत असतांना बुलडाणा शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्याला गावगुंडांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

बुलढाणा, 05 मे : राज्यात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाल्यामुळे पोलिसांवर ताण आणखी वाढला आहे. कोरोना संकट काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा संपूर्ण देश आणि सर्व समाजघटक गौरव करीत असतांना बुलडाणा शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्याला गावगुंडांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री 8 वाजेता हुसैनिया मस्जीद चौकात ही घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

बुलडाणा इथल्या हुसैनिया मस्जीद चौकात पोलीस कर्मचारी राजेश निकाळजे नेमून दिलेली ड्यूटी करीत होते. रात्री 5 ते 6 जण मोटरसायकलवर फिरतांना निकाळजे यांना आढळले. लॉकडाऊन असतांना आणि जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठीचा कालावधी संपलेला असतांना कुणालाही बाहेर पडता येत नाही. त्यातच मोटारसायकलस्वार तरूणांनी तोंडावर कुठलाच मास्क घातलेला नव्हता. त्या तरूणांना राजेश निकाळजे यांनी हटकलं आणि घरी जाण्यास सांगितलं.

'या' फोटो मागची कहाणी वाचून मुंबई पोलिसांबद्दल वाढेल अभिमान!

पोलिसांनी घरी जाण्यास सांगितलं याचा राग आल्याने तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. बुलडाणा शहर स्टेशनमध्ये मुख्य आरोपी जावेदसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतर फरार तरुण फरार असल्याचं सांगण्यात येत आहे.

पतीच्या मित्राच्या कारमध्ये होता महिला पोलीसाचा मृतदेह, धक्कादायक सत्य समोर

लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना मारहाण केल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. खरंतर आपल्या जीवाची परवा न करत आपल्यासाठी पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. अशा घटनांना आवर घालणं महत्त्वाचं आहे.

मालेगावमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी आला नवा सिंगम, शासनानं उचललं मोठं पाऊल

संपादन - रेणुका धायबर

First published:
top videos

    Tags: Corona