मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लॉकडाऊनमध्ये फिरण्यासाठी वडिलांनी दिली नाही बाईक, मुलानं उचललं टोकाचं पाऊल

लॉकडाऊनमध्ये फिरण्यासाठी वडिलांनी दिली नाही बाईक, मुलानं उचललं टोकाचं पाऊल

 लॉकडाऊन असल्यामुळे बाईकची चाबी मिळणार नाही, असे वडिलांनी मुलाला बजावलं होतं...

लॉकडाऊन असल्यामुळे बाईकची चाबी मिळणार नाही, असे वडिलांनी मुलाला बजावलं होतं...

लॉकडाऊन असल्यामुळे बाईकची चाबी मिळणार नाही, असे वडिलांनी मुलाला बजावलं होतं...

हिंगोली, 7 जून: लॉकडाऊनच्या काळात फिरण्यासाठी वडिलांनी बाईक दिली नाही म्हणूम एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसमत येथील बँक कॉलनीत शनिवारी ही घटना घडली. या प्रकरणी वसमत शहर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा... लॉकडाऊनमध्ये दररोज केवळ डाळ-भात देत होता रेस्टॉरंटचा मॅनेजर, वेटरनं केली हत्या

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात संचारबंदी आहे. वसमत येथील बँक कॉलनी भागातील प्रमोद शिवहार डांगे (वय-22) याने शहरात फिरण्यासाठी वडील शिवहार डांगे यांच्याकडे बाईकची मागणी केली. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे बाईकची चाबी मिळणार नाही, असे शिवहार डांगे यांनी मुलगा प्रमोद याला बजावलं. याचाच राग आल्याने प्रमोद याने घराच्या वरच्या खोलीमध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. घराच्या वरच्या खोलीतून आवाज येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर रात्री शिवहार डांगे यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नंतर शिवहार यांनी खिडकीतून आत डोकाऊन पाहिले असता प्रमोद याने गळफास घेल्याचे त्यांना आढळून आले.

हेही वाचा.. काय सांगताsss दारू स्वस्त होणार, राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

याबाबत त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. वसमत शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक उदय खंडेराय, जमादार प्रेमदास चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शिवहार डांगे यांच्या माहितीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार प्रेमदास चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

First published:

Tags: Crime, Marathwada