जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / साताऱ्यात घरगुती वादातून 10 महिन्यांच्या चिमुरड्याचा खून; विहीर मृतदेह आढळल्यानं खळबळ

साताऱ्यात घरगुती वादातून 10 महिन्यांच्या चिमुरड्याचा खून; विहीर मृतदेह आढळल्यानं खळबळ

साताऱ्यात घरगुती वादातून 10 महिन्यांच्या चिमुरड्याचा खून; विहीर मृतदेह आढळल्यानं खळबळ

क्षुल्लक कारणावरून वाढलेला घरगुती वाद एका 10 महिन्याच्या बाळाचा जीव घेण्यापर्यंत पोहचला. घटनास्थळी सातारा शहर पोलीस पोहचले आणि घटनेचा पंचनामा केला आहे.

  • -MIN READ Satara,Satara,Maharashtra
  • Last Updated :

सातारा, 06 ऑगस्ट : चुलत्याने पुतण्याचा विहिरीत ढकलून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साताऱ्यातील कोडोली येथील ही घटना असून घरगुती वादातून चुलत्याने दहा महिन्याच्या मुलाची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. मुलाचा नाहक बळी गेल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. क्षुल्लक कारणावरून वाढलेला घरगुती वाद एका 10 महिन्याच्या बाळाचा जीव घेण्यापर्यंत पोहचला. दुकानातून चॉकलेट घेऊन देतो, असं सांगून दहा महिन्याच्या शालमोल याला त्याचा चुलता घेऊन गेला आणि परिसरातील विहिरीमध्ये ढकलून त्याचा निर्घृण खून केला. बराच वेळ झाला तरी भाऊ बाळाला घेऊन घरी आला नाही, त्यामुळे घरच्यांनी शोध घेतला असता बाळ विहिरीत मृतावस्थेत सापडले. हे वाचा -  श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत घटनास्थळी सातारा शहर पोलीस पोहचले आणि घटनेचा पंचनामा केला आहे. या दहा महिन्याच्या बाळाचा निर्घृण खून करणाऱ्या अक्षय सोनवणे या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयीची माहिती पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर (सातारा शहर) यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात