नवी दिल्ली, 14 मे : कोरोना व्हायरसने देशात शिरकाव केल्यानंतर या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत आला तरीही कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नक्की थांबणार तरी कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच देशातील एका स्वयंसेवी संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातून धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरातमधील बहुतांश जिल्हे करोना संकटात असुरक्षित असल्याचे एका स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. केवळ इतकेच नव्हे तर या राज्यांच्या शेजारी असलेल्या राजस्थान आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्हेही वेगवान संसर्गामध्ये आघाडीवर राहतील, असा इशाराही संबंधित संस्थेने दिला आहे. स्वस्ती या संस्थेने विविध आकडेवारी व जागतिक निर्देशांकाचा अभ्यास करून काही निरीक्षणे प्रसिद्ध केली आहेत. या संस्थेच्या अंदाजामुळे शासन आणि प्रशासनासमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. देशातील आर्थिक स्थिती लक्षात घेता आणखी किती काळ लॉकडाऊन कायम ठेवायचा असाही प्रश्न आहे. तसंच अजून कोरोनावरील कोणतीही लस तयार झालेली नाही. त्यामुळे कोरोना संकट रोखून नागरिकांना दिलासा देण्याचं आव्हान असणार आहे. लॉकडाऊनमुळे भारतातील स्थिती भयंकर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एका सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत देशातील रोजगार आघाडीवरील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान, सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की दोन तृतियांश पेक्षा अधिक लोंकांनी आपले उपजीविकेचे साधन गमावले आहेत, तर जे लोक नोकरी सोडून गेले आहेत, त्यांचे उत्पन्न कमालीचे खाली आले आहे. परिस्थिती एवढी वाईट झाली आहे की निम्यापेक्षा अधिक घरात एकूण उत्पन्नातून आठवड्याभरासाठी आवश्यक वस्तू खरेदी करणेदेखील अवघड झाले आहे. **हेही वाचा -** BREAKING : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय लॉकडाऊनमध्ये फक्त मोठ्या कंपन्यांमधील काम ठप्प पडले आहे, असे नाही. सोबतच त्यावर आधारित स्वयंरोजगाराचे सर्व व्यवसायही बंद पडत आहेत. हे चिंतेचे एक मोठे कारण आहे. या सर्वेक्षणात आंध्र प्रदेश, बिहार, दिल्ली, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधील सुमारे4 हजार कामगार सहभागी झाले होते. संशोधकांनी कामगारांना त्यांची आर्थिक स्थिती आणि फेब्रुवारीमध्ये लॉकडाउनपासून मिळवलेल्या उत्पन्नाविषयी प्रश्न विचारले. स्वयंरोजगार असलेले लोक, रोजंदारीचे कामगार आणि सामान्य रोजगाराच्या कामगारांशीही चर्चा झाली. ग्रामीण भागातील बेरोजगारांची संख्या शहरांपेक्षा थोडी कमी आहे. येथे सुमारे 57 टक्के म्हणजेच दर दहा लोकांपैकी सहा जण प्रभावित आहेत. शहरी भागात परिस्थिती सर्वात वाईट आहे. दर दहा पैकी आठ जणांचा रोजगार गमावला आहे. म्हणजे 80 टक्के लोक बेरोजगार झाले आहेत. संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.