मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जळगावात एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादीला मोठा धक्का, नगराध्यक्षांसह 9 नगरसेवक 6 वर्षांसाठी निलंबित

जळगावात एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादीला मोठा धक्का, नगराध्यक्षांसह 9 नगरसेवक 6 वर्षांसाठी निलंबित


भुसावळ नगरपालिकेच्या अपात्र नगरसेवकांचा निकाल नगर विकास विभागाने कायम ठेवला आहे.

भुसावळ नगरपालिकेच्या अपात्र नगरसेवकांचा निकाल नगर विकास विभागाने कायम ठेवला आहे.

भुसावळ नगरपालिकेच्या अपात्र नगरसेवकांचा निकाल नगर विकास विभागाने कायम ठेवला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

भुसावळ, 19 ऑक्टोबर : भुसावळ नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. खडसे यांचे समर्थक माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह 9 नगरसेवक 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

भुसावळ नगरपालिकेच्या अपात्र नगरसेवकांचा निकाल नगर विकास विभागाने कायम ठेवला आहे. त्यामुळे भुसावळच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नगर विकास मंत्रालयातर्फे सदर निकाला बाबत आदेश पारीत करण्यात आला असून नगरपालिकेचे अध्यक्ष रमण भोळे, सदस्य सविता मकासरे, लक्ष्मी मकासरे, प्रमोद नेमाडे, मेघा वाणी, बोधराज चौधरी, शोभा नेमाडे, किरण कोलते, शैलजा नारखेडे यांना अपात्र घोषित केले आहे.

('खिसे कापणारे महाठग', बच्चू कडू यांचा राणा दाम्पत्यावर घणाघाती 'प्रहार')

भुसावळ नगरपालिकेचे तत्कालीन भाजप नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह भाजप नगरसेवक अमोल इंगळे, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे , प्रमोद नेमाडे, मेघा वाणी, बोधराज चौधरी, शोभा नेमाडे ,किरण कोलते, शैलजा नारखेडे, यांनी नगरपालिकेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अवघ्या काही दिवसांआधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत 17 डिसेंबर 2021 ला राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

याविरोधात भाजप नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी 28 डिसेंबर 2021 रोजी नगरसेवकांची अपात्र याचिका दाखल केली होती. यावर आता नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अंतिम सुनावणीनंतर माजी नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांना सहा वर्षासाठी केले निलंबित केल्याचे केले आदेश पारित केला आहे.

(मुख्यमंत्री साहेब,आम्हीपण ऊस तोडावा का? मजुराच्या मुलाचे थेट शिंंदेंना पत्र)

महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अधिनियम 1986, 1987 चा कलम ७ / ३ अन्वये . रमण देविदास भोळे लोकनियुक्त नगराध्यक्ष व इतरांच्या विरोधात हा निकाल असून पक्षांतर कायद्यांतर्गत सदर निकाल आहे. त्याच्या पक्षांतराबाबत राजीनामा व बाबत नगरपरिषद, पक्षास कुठल्याही अवगत केला नसल्याने सदर निकाल देण्यात आला आहे. आदेश जिल्हाधिकारी जळगाव आधीच्या विरुद्ध अपील फेटाळण्यात आले असून रमण भोळे आणि इतर नऊ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात पक्षांतरण केल्या असल्याने 18 ऑक्टोबरपासून ते सहा वर्षांच्या कालावधी करिता निलंबित ठरवण्यात आले आहे. सदर कारणाने भुसावळ नगरपालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकीत कोणत्या . पक्षाला याचा लाभ होईल त्याबद्दल भुसावळ येथे चर्चा सुरू असून कार्यकाल संपल्यानंतरचा हा निकाल कितपत लागू होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

First published:

Tags: Marathi news