मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

COVID-19: विद्यापीठानंतर आता महापालिकेतील 80 कर्मचारी पॉझिटिव्ह, अमरावतीमध्ये खळबळ

COVID-19: विद्यापीठानंतर आता महापालिकेतील 80 कर्मचारी पॉझिटिव्ह, अमरावतीमध्ये खळबळ

राज्यातून समोर येणारी कोरोनाची आकडेवारी (Coronavirus Cases in Maharashtra) काहीशी चिंताजनक आहे. अमरावती जिल्ह्यात शासकीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

अमरावती, 04 मार्च: राज्यातून समोर येणारी कोरोनाची आकडेवारी (Coronavirus Cases in Maharashtra) काहीशी चिंताजनक आहे. अमरावती जिल्ह्यात शासकीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठापाठोपाठ अमरावती शहराचं आरोग्य आणि स्वच्छता सांभाळणाऱ्या अमरावती महापालिकेतील 80 कर्मचारी अधिकाऱ्यांना (Amrawati Municipal Corporation 80 Employees tested Corona Positive) कोरोनाची लागण झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच शासकीय कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान यापैकी 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू  झाल्याची माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे (Prashant Rode) यांनी दिली आहे. कोरोना बाधिता मध्ये झोन क्रमांक 1,2,3 चे सहायक आयुक्त, शहर अभियंता, सिस्टीम मॅनेजर, विधी अधिकारी, डेप्युटी इंजिनिअर, डॉक्टर, लिपिक आदींचा समावेश आहे. यामुळे उर्वरित  कर्मचाऱ्यांवर कामाचा चांगलाच ताण येत आहे. (हे वाचा-चिंताजनक! राज्यात कोरोनाचा कहर, आढळले चार महिन्यातील सर्वाधिक रूग्ण) अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 671 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत आणि यापैकी 7 रुग्णांचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अमरावतीमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण वाढणारी आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. अमरावती शहरातील कार्यालये सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे.अमरावती महापालकेतील तब्बल 80 कर्मचारी कोरोना बाधित सापडल्याने या चिंतेत भर पडली आहे. शहरातील उच्चभ्रू आणि मध्यम वर्गीय भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागला आहे. शहरातील साईनगर, राजापेठ, दस्तुर नगर,अर्जुन नगर, श्याम नगर, कॅम्प, रुख्मिणी नगर, अंबापेठ हे भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. (हे वाचा-कोरोनाच्या सर्व रूपांवर प्रभावी लस मिळणार? शास्त्रज्ञांना अखेर मार्ग सापडलाच) अमरावती जिल्हात आतापर्यंत 30,067 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 7002 रुग्णांवर अमरावती जिल्हातील विविध कोव्हिड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Amravati, Corona, Corona hotspot, Corona spread, Corona updates, Corona vaccination, Covid-19 positive, Maharashtra

पुढील बातम्या