मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोनाच्या सर्व रूपांवर प्रभावी लस मिळणार? शास्त्रज्ञांना अखेर मार्ग सापडलाच

कोरोनाच्या सर्व रूपांवर प्रभावी लस मिळणार? शास्त्रज्ञांना अखेर मार्ग सापडलाच

कोरोना लस (corona vaccine) निर्मितीत या तंत्रज्ञानाचा फायदा होईल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

कोरोना लस (corona vaccine) निर्मितीत या तंत्रज्ञानाचा फायदा होईल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

कोरोना लस (corona vaccine) निर्मितीत या तंत्रज्ञानाचा फायदा होईल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

वॉशिंग्टन, 04 मार्च : विविध प्रकारच्या संसर्गजन्य रोगांचा (Infectious Disease) ठराविक कालावधीनंतर प्रसार होत असतो. सार्स, स्वाइन फ्लू आणि आता कोविड (coronavirus) अशा आजारांनी जगभर थैमान घातलं. त्या रोगांना प्रतिबंध करायचा तर प्रभावी लसीशिवाय (Vaccine) पर्याय नाही. ही लस तयार करण्यासाठी जगभरचे शास्त्रज्ञ अहोरात्र झटत असतात. आता शास्त्रज्ञांनी असा एक कॉम्प्युटर अल्गोरिदम (Computer Algorithm) तयार केला आहे, की जो लसनिर्मितीमध्ये फायदेशीर ठरू शकतो.

एपिग्राफ (Epigraph) असं या अल्गोरिदमचं नाव आहे. स्वाइन फ्लूच्या (Swine Flu) लसनिर्मितीमध्ये त्याचं साह्य घेण्यात आलं होतं. त्यातून इन्फ्लुएंझा (Influenza) या मूळ विषाणूच्या सगळ्या रूपांवर प्रभावी ठरू शकेल, अशी लस तयार करण्याचा मार्ग एपिग्राफने दाखवला. त्यामुळे कोरोना विषाणूच्याही (Coronavirus) सगळ्या रूपांना प्रतिबंध करू शकेल, अशी लस तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संशोधनाबद्दलचा अहवाल नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रसिद्ध झाला असून, इंडियन एक्स्प्रेसने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

एचआयव्ही (HIV) या विषाणूला प्रतिबंध करणारी लस कोणती असू शकेल, याच्या अभ्यासासाठीही एपिग्राफचा वापर करण्यात आला होता. तसंच एबोला (Ebola) आणि मार्बर्ग (Marburg) या अनेक रूपं असलेल्या विषाणूंना प्रतिबंध करणारी लस विकसित करण्यातही एपिग्राफ उपयुक्त ठरला. प्राण्यांवर या लशींची चाचणी झाली, तेव्हा ही लस प्रभावी असल्याचं स्पष्ट झालं. एपिग्राफच्या सहाय्याने तयार केलेली लस उंदरांना देण्यात आली, तेव्हा त्यांच्या शरीरात कणखर अँटिबॉडीज (Antibodies) तयार झाल्या. डुकरांना ही लस देण्यात आली, तेव्हा त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज आणि टी-सेलची निर्मिती झाली.

हे वाचा - Covaxin च्या अंतिम ट्रायलचा अहवाल जारी; लसीकरण सुरू असतानाच समोर आली मोठी माहिती

नेब्रास्का विद्यापीठातील नेब्रास्का सेंटर ऑफ व्हायरॉलॉजी, सेंट ज्यूड चिल्ड्रेन्स रिसर्च हॉस्पिटल आणि लॉस अल्मॉस नॅशनल लॅबोरेटरी या संस्थांतील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन हे संशोधन केलं आहे. कॉम्प्युटेशनल बायोलॉजिस्ट बेट कोर्बर यांनी लॉस अल्मॉसचे (Los Almos) फेलो असलेले आपले पती जेम्स थिलर यांच्यासह एपिग्राफ हा अल्गोरिदम विकसित केला आहे

कोर्बर यांनी लॉस अल्मॉसच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 'एपिग्राफचा वापर अनेक प्रकारच्या सूक्ष्मजीवांविरोधात करता येऊ शकतो. लशीचा प्रभाव वाढण्यासाठी एपिग्राफ हे टूल वेगवेगळ्या अँटिजेन्सची सरमिसळ करतं. आताच्या संशोधनामुळे फ्लूच्या मूळ विषाणूच्या सर्व रूपांना लागू पडेल, अशी लस विकसित करण्याच्या दिशेने वाटचाल झाली आहे. दुर्दैवाने स्वाइन फ्लू महासाथ स्वरूपात पुन्हा पसरला, तर एक प्रभावी आणि तातडीने उपाय ठरू शकेल, अशी लस तयार होण्याची आशा आहे. ही लस प्राण्यांमध्येही उपयुक्त ठरू शकेल. हेच तत्त्व कोरोना विषाणूच्या भविष्यातल्या विविध रूपांना लागू पडणारी लस तयार करण्यासाठीही लावता येऊ शकतं.'

हे वाचा - वेळीच लक्ष द्या, कोरोनामुळे होतोय 'हा' मानसिक आजार; उपचारांबाबत तज्ज्ञांचा सल्ला

या संशोधनाला अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेने सहाय्य केलं होतं. या अभ्यासात वापरण्यात आलेल्या एन्फ्लुंएझा व्हायरसचे रिएजंट्स बायोडिफेन्स अँड इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीज रिपॉझिटरीकडून उपलब्ध झाल्याचं लॉस अल्मॉसकडून सांगण्यात आलं.

First published:

Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Covid19, World After Corona