मराठी बातम्या /बातम्या /देश /अनोळखी पुरुषासोबत बोलल्याने सासरच्यांकडून तालिबानी शिक्षा; विवाहितेला झाडाला बांधलं अन्...

अनोळखी पुरुषासोबत बोलल्याने सासरच्यांकडून तालिबानी शिक्षा; विवाहितेला झाडाला बांधलं अन्...

Crime News: रस्त्यावरून जाणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीशी बोलणं (talk with unknown man) एका विवाहित महिलेला चांगलंच महागात पडलं आहे.

Crime News: रस्त्यावरून जाणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीशी बोलणं (talk with unknown man) एका विवाहित महिलेला चांगलंच महागात पडलं आहे.

Crime News: रस्त्यावरून जाणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीशी बोलणं (talk with unknown man) एका विवाहित महिलेला चांगलंच महागात पडलं आहे.

रामपूर, 28 सप्टेंबर: रस्त्यावरून जाणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीशी बोलणं (talk with unknown man) एका विवाहित महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित अनोळखी पुरुषासोबत बोलत असल्याचं गावातील एका व्यक्तीने पाहिल्यानंतर, कोणताही जाब न विचारता सासरच्या लोकांनी विवाहित महिलेला तालिबानी शिक्षा (in law family beat married woman) दिली आहे. आरोपींनी पीडित महिलेला झाडाला बांधून जबरी मारहाण (Tied to tree and beat) केली आहे. दरम्यान, घटनास्थळी असलेल्या अनोळखी व्यक्तीने आपला जीव मुठीत घेत घटनास्थळावरून पळून जात आपला जीव वाचवला आहे.

यानंतर संबंधित व्यक्तीनेच पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित घटनेची फिर्याद दाखल केली आहे. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील रामपूरजवळील बिलासपूर येथे घडली आहे. दरम्यान, महिलेला मारहाण होतानाचा व्हिडीओही सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. संबंधित व्हिडीओत काहीजण पीडित महिलेला झाडाला बांधून बेदम मारहाण करताना दिसत आहेत. तर पीडित महिला जीवाच्या आकांताने जोरजोरात ओरडत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

हेही वाचा-'बायको लवकर घरी ये, भांडायला जायचंय', नकार दिल्याने चाकू भोकसून पत्नीला संपवलं

याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांअंतर्गत सासरच्या 4 लोकांसह 19 अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती देताना, तक्रारदार व्यक्तीने सांगितलं की, तो आपल्या घरून बिलासपूर याठिकाणी जात होता. दरम्यान रस्त्यात त्यांना पीडित महिला दिसली. पीडित महिला चेहऱ्यावरून ओळखीची वाटल्याने फिर्यादीने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका स्थानिक ग्रामस्थाने हे दृश्य पाहिलं आणि याची माहिती पीडित महिलेच्या सासरच्या लोकांना दिली.

हेही वाचा-बलात्काराच्या घटनेनं नाशिक हादरलं! तोंडात बोळा कोंबत व्यावसायिक महिलेवर अत्याचार

आपली सून अनोळखी व्यक्तीसोबत बोलत असल्याचं समजात, सासऱ्याच्या लोकांनी तावातावाने घटनास्थळी धाव घेतली. सासरच्या लोकांचा रोष पाहून फिर्यादी व्यक्ती कसाबसा घटनास्थळावरून फरार झाला. यामुळे पीडित महिलाच सासरच्या लोकांच्या तावडीत सापडली. यानंतर सासरच्या मंडळींनी पीडित महिलेला झाडाला बांधून बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी सासरच्या लोकांकडे चौकशी केली असता, पीडित महिलेचे फिर्यादी व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप सासरच्या लोकांकडून करण्यात आला आहे. या घटनेचा  पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Beating retreat, Crime news, Uttar pardesh