कोरोनाव्हायरसनंतर म्युकोरमायकोसिसचं नवं संकट आ वासून उभं राहिलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अशा रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे. राज्यात आतापर्यंत अशा 200 रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. उपचारादरम्यान 8 रुग्णांचे डोळे काढावे लागले आहेत. राज्याचे वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितलं, म्युकोरमायकोसिस इन्फेक्शनमुळे 8 रग्णांचे डोळे काढण्यात आले आहे. हे एक फंगल इन्फेक्शन आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येत आहे. या आजारामुळे डोळे किंवा जबड्यामध्ये इन्फेक्शन होतं, यामुळे रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी या रुग्णांचे डोळे काढण्यात आले आहेत. हे वाचा - राज्यात आज मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनामुक्त; राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे याआधी सूरतमध्ये तब्बल 8 रुग्णांचे डोळे (Corona patient eye removed) काढण्यात आले आहेत. म्युकोरमायकोसिसची लक्षणं तीव्र डोकेदुखी अंगात सतत बारीक ताप असणं गालावर सूज किंवा बधिरपणा येणं नाक गळणं जबड्यातील हिरड्यांवर पू असलेल्या पुळ्या येणं वरच्या जबड्यातील दातांचं हलणं जबड्याची टाळू आणि नाकातील त्वचा यांचा रंग काळसर होणं. वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणं. आजार टाळण्याचे उपाय तोंडामध्ये आणि नाकातील पोकळ्याना सौम्य निर्जंतुकीकरण द्रावणानं धुणं मधुमेही रुग्णांना उपचारादरम्यान स्टेरॉइड आणि इतर इंजेक्शनचा नियंत्रित वापर करणं. रोगप्रतिकारशक्ती वर्धक बाबींचा आहारामध्ये समावेश करणं. लक्षणं आढळल्यास लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणं आणि उपचार करणं. हे वाचा - मुंबईकरांना मोठा दिलासा! शहरातील कोरोना परिस्थितीचा 'पॉझिटिव्ह' आकडा त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर तुमच्यामध्ये अशी काही लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर तुमच्या जीवावर बेतू शकतं.CORRECTION: At least 8 COVID survivors have lost vision in an eye due to #mucormycosis, a fungal infection, in Maharashtra & 200 others are being treated, says official. He had earlier said 8 COVID survivors died but later clarified that he said so inadvertently
— Press Trust of India (@PTI_News) May 8, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Coronavirus