Home /News /maharashtra /

मोठा दिलासा! आज राज्यात तब्बल 82,266 रुग्णांची कोरोनावर मात; रिकव्हरी रेटही वाढला

मोठा दिलासा! आज राज्यात तब्बल 82,266 रुग्णांची कोरोनावर मात; रिकव्हरी रेटही वाढला

Maharashtra Corona news: राज्यात आज तब्बल 82,266 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.

  मुंबई, 8 मे: महाराष्ट्राला एक मोठा दिलासा (Big relief for Maharashtra) देणारी बातमी आहे. कारण, आज मोठ्या संख्येत कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज राज्यात 82,266 रुग्ण बरे (82,266 patients discharged) होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट सुद्धा वाढला (Maharashtra recovery rate increased) आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 43,47,592 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.3 टक्के इतके झाले आहे. राज्यात आज 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,91,94,331 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 50,53,336 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वाधिक सक्रिय रुग्ण कुठल्या जिल्ह्यात? सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात 1,06,829 सक्रिय रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात एकूण 62,159 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 52,874 सक्रिय रुग्ण आहेत तर ठाण्यात एकूण 43,510 सक्रिय रुग्ण आहेत. नाशिक जिल्ह्यात 40,141 सक्रिय रुग्ण आहेत. आज कुठल्या विभागात किती रुग्णांची नोंद? ठाणे मंडळ - 7541 रुग्णांचे निदान नाशिक - 8834 रुग्णांचे निदान पुणे - 140,56 रुग्णांचे निदान कोल्हापूर - 5206 रुग्णांचे निदान औरंगाबाद - 2355 रुग्णांचे निदान लातूर - 3491 रुग्णांचे निदान अकोला - 4427 रुग्णांचे निदान नागपूर - 7695 रुग्णांचे निदान वाचा: सिंधुदुर्गात कोरोनाचा समूह संसर्ग; संपूर्ण जिल्ह्यात Lockdown जाहीर राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांचा तपशील 
  अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूॲक्टिव्ह रुग्ण
  मुंबई६७३२३५६०४८५८१३७१३१७९०५२८७४
  ठाणे५३५२५८४८४४०८७३०९३१४३५१०
  पालघर९९८०५८०६२६१२५७१०१७९१२
  रायगड१३१६२१११६९४२२२९५१२३८२
  रत्नागिरी२९२९०२०००३५७६८७०९
  सिंधुदुर्ग१६३१८११६१९४०४४२९५
  पुणे९१८७४४८०१८३३१००२४५८१०६८२९
  सातारा१२०५७६९६०३७२४६०१२२२०६७
  सांगली९३७११७१८७२२२३४१९६०३
  १०कोल्हापूर७७५६१५९८५५१९५६१५७४७
  ११सोलापूर१२५०२७९९५७८२९५२५९२२४३८
  १२नाशिक३४७९८७३०४१७९३६६६४०१४१
  १३अहमदनगर१९९८१९१७३१३२२२५९२४४२७
  १४जळगाव१२६०४०११०४७०२०५५३११३४८४
  १५नंदूरबार३६७६७३१११७६५८४९९०
  १६धुळे३९९२२३५७२९४७७१२३७०४
  १७औरंगाबाद१३३३३३११८७०२२१७६१४१२४४१
  १८जालना५०११०४२३४४७२४७०४१
  १९बीड६६३१५५१३७४१०७३१३८५९
  २०लातूर८०१८०६८३२९१२८२१०५६५
  २१परभणी४२४८३३०८०६६९५१११०९७१
  २२हिंगोली१५३९८१३२६०२२६१९१२
  २३नांदेड८५७६४७८१४६१८०८५८०२
  २४उस्मानाबाद४४८३१३६९७५१०६७१८६७७१
  २५अमरावती७०५६०६०८५०१०४४८६६४
  २६अकोला४५११६३९१४२६८४५२८६
  २७वाशिम३१०५८२६४६८३८३४२०४
  २८बुलढाणा५९१९९४९८९६३८४८९१४
  २९यवतमाळ५९११३५०७०७१०९५७३०७
  ३०नागपूर४६११७१३९३३८७५५७९४६६२१५९
  ३१वर्धा४९३१४४१३३०६५३८३७२४८
  ३२भंडारा५५८०५४७७३७५४२७५१९
  ३३गोंदिया३५८८५३११३२३८२४३६५
  ३४चंद्रपूर७२२७५४५१८७८४१२६२४५
  ३५गडचिरोली२३५९९१९५६२२२६३८०२
  इतर राज्ये/ देश१४६११८२६
  एकूण५०५३३३६४३४७५९२७५२७७२२५४६२८२१३
  आज राज्यात 864 नवीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 399 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत तर 226 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 239 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Coronavirus, Maharashtra

  पुढील बातम्या