Home /News /nagpur /

Nagpur: माहेरी आली अन् सख्ख्या भावाची ठरली बळी; बहिणीचा तडफडून झाला मृत्यू

Nagpur: माहेरी आली अन् सख्ख्या भावाची ठरली बळी; बहिणीचा तडफडून झाला मृत्यू

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Murder in Nagpur: नागपूर जिल्ह्यातील मोहप्पा परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने माहेरी आलेल्या आपल्या बहिणीची निर्घृण हत्या (Brother killed sister) केली आहे.

    नागपूर, 04  जानेवारी: नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील मोहप्पा परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने माहेरी आलेल्या आपल्या बहिणीची निर्घृण हत्या (Brother killed sister) केली आहे. आरोपी भावानं बांबूच्या काठीने बहिणीच्या डोक्यात प्रहार करून तिला रक्तबंबाळ केलं आहे. हा हल्ला इतका भयावह होता, की बहिणीचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी आरोपी भावाला अटक (Accused brother arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. उज्ज्वला अर्पित भोजने असं हत्या झालेल्या 32 वर्षीय विवाहित बहिणीचं नाव आहे. त्या नागपूर जवळील पिपळा रोडवरील धनगवळीनगर येथील रहिवासी आहेत. तर शरद विठोबाजी गणोरकर असं 30 वर्षीय आरोपी भावाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत उज्ज्वला या काही दिवसांपूर्वी आपल्या दोन जुळ्या मुलांना आणि पतीला घेऊन माहेरी आल्या होत्या. माहेरी आल्यानंतर झालेल्या कौटुंबीक कलहातून भावाने बहिणीची निर्घृण हत्या केली आहे. हेही वाचा-21 वर्षीय तरुणीवर भरदिवसा सामूहिक बलात्कार; तिघांनी आळीपाळीने दिल्या नरक यातना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शरद याचा आपली आई सरस्वती यांच्यासोबत सतत कोणत्या ना कोणत्या कारणातून वाद होत होता. सोमवारी घटनेच्या दिवशी देखील मायलेकात वाद झाला होता. यावेळी बहीण उज्ज्वला यांनी दोघांत मध्यस्थी केली. त्यामुळे बहीण-भावांत भांडणाला सुरुवात झाली आणि जुना जमिनीचा वाद उफाळून निघाला. यावेळी बहीण उज्ज्वला यांनी रागाच्या भरात एक विटाचा तुकडा आरोपी भाऊ शरद याला फेकून मारला. हेही वाचा-अल्पवयीन मुलांकडून सिनेस्टाईल खून; दुकानात लपलेल्या तरुणाला रस्त्यावर आणून ठेचलं यामुळे संतापलेल्या शरद याने जवळच पडलेल्या बांबूने आपल्या बहिणीच्या डोक्यात जबरी घाव घालत रक्तबंबाळ केलं. यावेळी उज्ज्वला यांचा पती आणि दोन्ही लहान मुलं तिथेच होती. आरोपी शरद याने आपले दोन भाचे आणि दाजींसमोरच बहिणीला रक्तबंबाळ केलं. या घटनेनंतर उज्ज्वला यांचे पती आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने सावनेरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी तपासून उज्ज्वला यांना मृत घोषित केलं. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा माहिती कळमेश्वर पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Nagpur

    पुढील बातम्या