जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चिंताजनक बातमी, जळगावमध्ये डेल्टा प्लसचे 6 नवे रुग्ण आढळले, 7 वर्षांच्या चिमुरड्याचाही समावेश

चिंताजनक बातमी, जळगावमध्ये डेल्टा प्लसचे 6 नवे रुग्ण आढळले, 7 वर्षांच्या चिमुरड्याचाही समावेश

 कोरोनाची लाट रोखण्यासाठी लसीकरणावर जास्त भर दिला जात आहे. पण, डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये लशीचे दोन्ही डोस घेतलेले 10 जण आढळले आहे.

कोरोनाची लाट रोखण्यासाठी लसीकरणावर जास्त भर दिला जात आहे. पण, डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये लशीचे दोन्ही डोस घेतलेले 10 जण आढळले आहे.

आज नव्याने आढळलेले 6 रुग्णांमध्ये जळगाव महानगरपालिका क्षेत्रात 02, जामनेर तालुक्यात 03 व पारोळा तालुक्यात 01 अशा सहा रुग्णांचा समावेश…

  • -MIN READ
  • Last Updated :

जळगाव, 09 ऑगस्ट : कोरोना (corona) लाटेतून महाराष्ट्र कसाबसा सावरला असताना आता आणखी एक नवे संकट उभे ठाकले आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे (delta plus variant) रुग्ण वाढायला लागले आहे. मुंबई (mumbai), ठाणे, मराठवाड्यापाठोपाठ आता जळगावमध्ये (jalgaon) डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 6 नवे रुग्ण आढळून आले आहे. जून महिन्यात महिन्यात 7 डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा 6 रुग्ण आढळल्याने जळगाव जिल्ह्यातील एकूण डेल्टा प्लस रुग्णांची संख्या 13 झाली आहे.  जून महिन्यात आढळलेले 7 डेल्टा प्लसची रुग्ण हे जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात आढळले होते. VIDEO : या दुकानात चहासोबत मिळते किशोर कुमार यांच्या गाण्यांची जादू आज नव्याने आढळलेले 6 रुग्णांमध्ये जळगाव महानगरपालिका क्षेत्रात 02, जामनेर तालुक्यात 03 व पारोळा तालुक्यात 01 अशा सहा रुग्णांचा समावेश असून आढळलेले सहा रुग्ण हे 17 ते 7 या वयोगटातील असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान, नाशिक, मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही डेल्टा संसर्गाचा (Delta variant) शिरकाव झाल आहे. ठाण्यात (Thane) आज डेल्टा संसर्गाची बाधा झालेले चार रुग्ण आढळले आहेत. संबंधित सर्व रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण आढळल्यानंतर ठाणे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दिल्लीत भाजप नेत्यांची ‘खाणे पे चर्चा’, फडणवीस आणि पंकजा मुंडे आमनेसामने पण… नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. आज ठाणे परिसरात आढळलेल्या एकूण चार डेल्टा व्हेरिअंट बाधित रुग्णांमध्ये 25 वर्षांखालील 3 रुग्ण आहेत, तर एक रुग्ण 53 वर्षांचा आहे. नाशिक आणि मुंबई पाठोपाठ ठाण्यात डेल्टा व्हेरिअंटने धडक घेतल्यानं नागरिकांमध्ये भीतीच वातावरण तयार झालं आहे. पण नागरिकांनी काळजी करण्याचं काहीही कारण नाही, कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेशी आणि डेल्टा व डेल्टा प्लस व्हेरिअंटशी लढण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात