जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ठाण्यात बुलेट ट्रेनसाठी जमिनी देणाऱ्या भूमिपुत्रांसोबत धक्कादायक प्रकार, मनसेनं दिला इशारा

ठाण्यात बुलेट ट्रेनसाठी जमिनी देणाऱ्या भूमिपुत्रांसोबत धक्कादायक प्रकार, मनसेनं दिला इशारा

आमचा कोठेही प्रकल्पाला विरोध नसून जो इतरांना मोबदला दिला गेला तोच मोबदला आम्हाला द्यावा अन्यथा आम्ही ट्रिब्युनलमध्ये दाद मागू

आमचा कोठेही प्रकल्पाला विरोध नसून जो इतरांना मोबदला दिला गेला तोच मोबदला आम्हाला द्यावा अन्यथा आम्ही ट्रिब्युनलमध्ये दाद मागू

आमचा कोठेही प्रकल्पाला विरोध नसून जो इतरांना मोबदला दिला गेला तोच मोबदला आम्हाला द्यावा अन्यथा आम्ही ट्रिब्युनलमध्ये दाद मागू

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे, 29 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बुलेट ट्रेनकडे पाहिले जाते आणि हा प्रकल्प राज्यातील ठाणे जिल्ह्यात होत असून दिवा या भागात बुलेट ट्रेन संदर्भात महत्त्वाचे काम सुरू आहे. सुरुवातीला या बुलेट ट्रेनला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. पण बुलेट ट्रेन दिवा-शिळ-डायघर या भागात येण्याने या भागांना पर्यायाने इथल्या नागरिकांना भूमिपुत्रांना या बुलेट ट्रेनचा किती फायदा आहे. यामुळे त्यांच्या जीवनात किती अमुलाग्र बदल होतील याबाबत योग्य ती माहिती आणि जनजागृती केल्यानंतर जवळपास शंभर टक्के भूमिपुत्रांनी बुलेट ट्रेनला पाठिंबा देत योग्य मोबदला मिळेल या अपेक्षेने आपल्या जमिनी दिल्या. मात्र आता एक धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणाला कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी वाचा फोडली असून यासंबंधी त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. (SRA घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, किरीट सोमय्यांनी केला नवा दावा) शीळ डायघर येथील नंदू पाटील या भूमिपुत्राचे अधिकृत, सातबारावर नोंदी असलेली, टॅक्स पावती, लाईट बिल असलेली पक्की 40 घरे आहेत या घरांची सुरुवातीला मोजमाप करताना वीस घरे दाखवली गेली. नंतर पुन्हा मोजणीची विनंती केल्यावर नंदू पाटील यांची माफी मागून चाळीस घरांची नोंदणी दाखवून त्यांना प्रत्येक घरामागे जवळपास सहा लाख रुपये मोबदला दिला गेला. आपला बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध नसल्याने आणि इतरांना जो मोबदला मिळाला आहे. तोच मोबदला आपल्याला मिळेल या अपेक्षेने नंदू पाटील यांनी आपली जमीन बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी दिली. मात्र सरकारी जागेवर अनधिकृत बांधकाम ताडपत्री लावून उभ्या केलेल्या झोपडपट्ट्या यांना 14 लाख रुपये पेक्षा जास्त प्रत्येकी घराला मोबदला दिला गेला ही माहिती समोर आल्यानंतर नंदू पाटील यांनी तात्काळ अधिकाऱ्यांची चर्चा केली.त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला आणि मनसे आमदार राजू पाटील यांना देखील याबाबत कल्पना दिली. (‘जगात जे काही घडले ते सरकार आल्यामुळेच’ शिवसेनेनं उडवली शिंदे सरकारची खिल्ली) कोणाचाही बुलेट ट्रेनला विरोध नसून योग्य ठिकाणी दाद मागितली तर नंदू पाटील यांना योग्य तो मोबदला मिळू शकतो आणि संबंधित लोकांना धडा मिळेल या उद्देशाने नंदू पाटील आणि आमदार राजू पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली यादरम्यान अशा प्रकारे नसलेल्या ठिकाणी घरे दाखवणे आणि जास्तीचा मोबदला देणे याकरता एक मोठे रॅकेट कार्यरत असून यामध्ये काही अधिकार देखील सहभाग आहे अशी तोंडी तक्रार मनसे आमदार राजू पाटील यांनी आणि नंदू पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तसंच आमचा कोठेही प्रकल्पाला विरोध नसून जो इतरांना मोबदला दिला गेला तोच मोबदला आम्हाला द्यावा अन्यथा आम्ही ट्रिब्युनलमध्ये दाद मागू असं प्रकल्प बाधित नंदू पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यावर येत्या काही दिवसात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावून नेमका काय प्रकार घडलेला आहे नक्की अन्याय झाला आहे का झाला असेल तर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मनसे आमदार राजू पाटील आणि प्रकल्प बाधित नंदू पाटील यांना सांगण्यात आले आहे. खरं पाहिला गेला तर प्रकल्पाला कोणाचा विरोध नसून अशा प्रकारे सुरू असलेल्या रॅकेट मार्फत भूमिपुत्रांना जो त्रास होतोय. तो जर वेळीच थांबवला गेला नाही तर भूमीपुत्र संताप्त होतील अन्यथा न्यायालयात धाव घेतील. यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला जाईल आणि त्याचा परिणाम प्रकल्पावर होऊन आर्थिक बोजा वाढेल हे होऊ नये याकरता केंद्र सरकार, बुलेट ट्रेनचे अधिकारी, ठाणे जिल्हा प्रशासकीय अधिकारी आणि राज्य सरकार यांनी वेळीच लक्ष घातले नाही तर बुलेट ट्रेन प्रकल्प उशिरा होण्याचे संकट ओढावू शकते. असं मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले असून जर नंदू पाटील सारख्या प्रकल्पबाधितांना योग्य न्याय नाही मिळाला नाही तर येत्या नागपूर अधिवेशनामध्ये याविषयी सभागृहात मी आवाज उठवेल असा इशाराही राजू पाटील यांनी दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात