Home /News /maharashtra /

राज्यावर नव्या Coronavirus चं सावट! UK हून 45 नागरिक थेट कल्याणमध्ये

राज्यावर नव्या Coronavirus चं सावट! UK हून 45 नागरिक थेट कल्याणमध्ये

ब्रिटनहून (britain) नागरिक महाराष्ट्रात दाखल झाल्यानं नव्या कोरोनाचं (new coronavirus) संकट ओढावतंय की काय या भीतीनं राज्य सरकार आणि प्रशासनाची झोपच उडाली आहे.

    कल्याण, 24 डिसेंबर : ब्रिटनमध्ये (Britain) आढळलेल्या नव्या कोरोनाची (corona new strain) धास्ती संपूर्ण जगानं घेतली आहे. भारतासह अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. राज्य सरकारनं रात्रीच्या वेळी संचारबंदी जारी केली आहे. शिवाय आता गेल्या महिनाभरात ब्रिटनमधून आलेल्या नागरिकांची यादी राज्य सरकारनं तयार केली आहे. त्यामध्ये कल्याणमधील नागरिकांचाही समावेश आहे. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत 45 नागरिक ब्रिटनमधून कल्याणमध्ये परतले आहेत. त्यांच्या नावाची यादी राज्य सरकारने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे सुपूर्द केली आहे आणि या सर्वांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासणीदरम्यान या नागरिकांमध्ये काही लक्षणं दिसल्यास या नागरिकांचे स्वॅब पुण्याच्या प्रयोगशाळेत धाडले जाणार आहेत, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रोग प्रतिबंधक अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. हे वाचा - कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात, विदेशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे आव्हान वाढलं कल्याण-डोंबिवलीमधील कोरोना रुग्णाचे प्रमाण वेगाने कमी होत असून आजमितीला केवळ 1000 रुग्ण उपचार घेत आहेत तर 55 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र या यादीमुळे मागील 9 महिन्यानंतर आता कुठे मोकळा श्वास घेत असलेल्या पालिका प्रशासनाची झोप उडाली आहे. राज्यावर आता नव्या कोरोनाव्हायरसचं संकट ओढावतंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कारण ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढू लागली आणि याचं कारण म्हणजे कोरोनाचं नवं रूप असल्याचं सांगितलं जातं आहे. भारताने डिसेंबर अखेरीपर्यंत भारतात ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांवर क्वारंटाइनचे कडक नियम करण्यात आले आहेत. आतापर्यंत ब्रिटनमधून इथे आलेल्या किंवा ब्रिटनमधल्या कुठल्याही शहरात थांबा घेऊन आलेल्या (Transit passangers) प्रवाशांना कोरोना चाचणी (RT-PCR test) बंधनकारक करण्यात आली आहे. विमानतळावरच त्यांची चाचणी करावी आणि या चाचणीचा निकाल आल्याशिवाय त्यांना घरी जाता येणार नाहीस, असाही नियम करण्यात आला आहे. हे वाचा - घाबरू नका! नव्या कोरोनाविरोधातही प्रभावी लस; औषध कंपनीकडून मोठा दिलासा दरम्यान यूकेमध्ये SARS-CoV-2 चा जो नवा स्ट्रेन दिसून आला आहे, तो अधिक संसर्गजन्य आहे.  पण कोरोनाव्हायरसमधील हा बदल गंभीर आजार निर्माण करणारा नाही किंवा त्यामुळे मृत्यूचा धोका अधिक आहे असं नाही, हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या