घाबरू नका! नव्या कोरोनाविरोधातही प्रभावी लस; औषध कंपनीकडून मोठा दिलासा

घाबरू नका! नव्या कोरोनाविरोधातही प्रभावी लस; औषध कंपनीकडून मोठा दिलासा

कोरोनाविरोधातील लस (corona vaccine) मिळताच त्यानं आपलं रूप बदललं (corona new strain) आणि मग ही लस या कोरोनावरही प्रभावी ठरणार की नाही, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला.

  • Share this:

वॉशिंग्टन, 24 डिसेंबर :  पुढच्या वर्षी कोरोनाविरोधातील लस (corona vaccine) उपलब्ध होईल अशी आशा आहे. वर्षाअखेर थोडाफार का होईन दिलासा मिळाला. मात्र आता नव्या कोरोनाचं (corona new strain) संकट ओढावलं आहे. लस येताच कोरोनानं आपलं रूप बदललं आणि मग कोरोनाविरोधातील लस या नव्या कोरोनावर प्रभावी ठरेल का असा प्रश्न निर्माण झाला. पण ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनाव्हायरसविरोधात अमेरिकेची कोरोना लस प्रभावी आहे, असा दावा अमेरिकेतील औषध कंपनीनं केला आहे.

अमेरिकेतील मॉडर्ना (moderna) कंपनीनं तयार केलेली कोरोना लस. ही लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविरोधातही प्रभावी आहे असा दावा मॉडर्ना कंपनीनं केला आहे. मॉडर्ना कंपनीच्या लशीला अमरिकेत आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ही लस नव्या कोरोनापासूनही संरक्षण देईल असा विश्वास कंपनीला आहे.  याचा पुरावा देण्यासाठी कंपनी चाचणीही करणार आहे. पुढील काही आठवड्यात हे टेस्टिंग होईल, असं वृत्त आज तकनं दिलं आहे.

हे वाचा - धक्कादायक! ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता

याआधी सुरू असलेल्या क्लिनिक ट्रायलनुसार कंपनीनं ही लस लक्षणं न दिसणाऱ्या (Asymptomatic Infections) कोरोना रुग्णांवर देखील प्रभावी ठरणार आहे. त्याचबरोबर या लशीचा एक डोस या रुग्णांना पुरेसा ठरणार असून एका लशीमध्येच त्यांना फायदा मिळणार आहे. ही लस घेतल्यानंतर शरीरामध्ये 3 महिने अँटीबॉडी राहत असल्याचा दावाही कंपनीने केलेला आहे.

हे वाचा - मेड इन इंडिया कोरोना लशीचे सकारात्मक परिणाम; COVAXINला आपात्कालीन मंजुरी मिळणार?

ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढू लागली आणि याचं कारण म्हणजे कोरोनाचं नवं रूप असल्याचं सांगितलं जातं आहे. फक्त ब्रिटनच नाही तर इतर काही देशांमध्येही हा स्ट्रेन दिसून आला आहे. नवा कोरोना अधिक संसर्गजन्य आहे.  पण कोरोनाव्हायरसमधील हा बदल गंभीर आजार निर्माण करणारा नाही किंवा त्यामुळे मृत्यूचा धोका अधिक आहे असं नाही, हे भारताच्या आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

Published by: Priya Lad
First published: December 24, 2020, 4:50 PM IST

ताज्या बातम्या