जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रिसॉर्टमध्ये मजा झाली सजा, कुटुंबाच्या समोर 4 वर्षाचा मुलगा स्विमिंग पूलमध्ये बुडाला

रिसॉर्टमध्ये मजा झाली सजा, कुटुंबाच्या समोर 4 वर्षाचा मुलगा स्विमिंग पूलमध्ये बुडाला

(विरारमध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू)

(विरारमध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू)

पंधरा दिवसात विरारच्या अर्नाळा येथील नवापूर समुद्रकिनाऱ्यावर 2 रिसॉर्टमध्ये 2 जण स्विमिंग पूलात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

राजा मयाल, प्रतिनिधी वसई, 15 जून : वसई विरारला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट संस्कृती बहरली आहे. येथील बहुतेक रिसॉर्ट सीआरझेडच्या नियमांच उल्लंघन करुन बांधली आहेत. येथील रिसॉर्टमधील सुरक्षा व्यवस्था राम भरोसे आहे. त्यामुळे या पंधरा दिवसात विरारच्या अर्नाळा येथील नवापूर समुद्रकिनाऱ्यावर 2 रिसॉर्टमध्ये 2 जण स्विमिंग पूलात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिनांक 12 जून ला विरार येथील “सेवन सी” या रिसॉर्टवर 4 वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बांद्रा इथं राहणारे मुदतसार नाजीर कुरेशी यांची पत्नी नातेवाईकांसोबत 4 वर्षाचा मुलगा मोहम्मद इमाम मुदतसर कुरेशी याला घेऊन सोमवारी नवापूर येथील सेव्हन सी रिसॉर्टवर गेल्या होत्या. त्यांचा मुलगा दुपारी बाराच्या सुमारास तरण-तलावाच्या पाण्यात पडल्याने त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. अर्नाळा पोलिसांनी यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

तर सेवन सी रिसॉर्टच्या मालकाशी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. सेवन सी रिसॉर्ट हा नुकताच बनला, अजूनही त्याचं काम सुरू आहे. तरण तलावाच्या इथं सीसीटीव्ही कॅमेरा ही नव्हता. रिसॉर्टच्या मालकाच्या म्हणण्याप्रमाणे 4 वर्षीय बालकाच्या नातेवाईकाना लहान मुलगा पाण्याजवळ न ठेवण्याची विनंती केली होती, असं सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्या रिसॉर्टच्या समोरच्या क्षितिज रिसॉर्टमध्ये ही एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. या परिसरातील बहुतेक रिसॉर्टनी सीआरझेड कायद्याचं उल्लघन करून, अनधिकृत रिसॉर्ट थाटली आहेत. काही दिवसांपूर्वीचं वसईच्या महसूल विभागाने येथील अनधिकृत रिसॉर्ट वर कारवाई केली होती. (पुणे : पती वेळ देत नव्हता, पत्नीने जे केलं ते हादरवणारंच, सर्वच जण चक्रावले) मात्र तरीही रिसॉर्ट आता पुन्हा सुरू झाले आहेत. येथील बहुतेक रिसॉर्टमध्ये सुरक्षेचे उपाययोजना नीट केल्या नाहीत. त्यामुळे पालिका प्रशासन, तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रितरित्या अशा रिसॉर्ट वर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात