परभणी, 28 फेब्रुवारी : राज्यात सोशल मीडियावरील लोकांची संख्या वाढत आहेत. त्यातच इंटरनेटवर असंख्य तरुणांमध्ये इन्स्टा रिल्सची खूप क्रेझ आहे. अनेक तरुण-तरुणी इन्स्टा रिल्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. मात्र, काही वेळा रील्स बनवणे महागात पडण्याची शक्यता असते. अशीच घटना परभणीमधून समोर आली आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी तांडा येथे ही घटना घडली. रिल्स बनवणाऱ्या तरुणांच्या गाडीने पायी जाणाऱ्या जैन मुनींसह एका सेवेकऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. तर हे चारही मुले अल्पवयीन आहे. तक्रार द्यायला नकार - विशेष म्हणजे त्यांनी जैन मुनींसह एका सेवेकऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. मात्र, तरीसुद्धा या चारही जणांविरोधात या मुनींनी तक्रार देण्यास नकार दिला आहे. सध्या या दोन्ही मुनींची प्रकृती स्थिर आहे. या घटनेवरुन आजची तरुण पिढी रिल्सच्या विळख्यात किती अडकली आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. Instagram वरील ओळखीचं प्रेमात रुपांतर, 2 मुलांच्या आईचा धक्कादायक निर्णय… स्ट्रेचरवर सौम्यसागर मुनी यांना जिंतूरला नेण्यात आले - परभणीच्या बोरी येथून जिंतूरकडे जैन मुनी सौम्यसागरजी इतर मुनींसह जात होते. यावेळी बोरी तांड्याजवळ दोन दुचाकीवर चार युवक रिल्स बनवत होते. त्यांच्या गाडीने सौम्यसागरजी यांच्यासह त्यांचा सेवेकरी संकेत मोहारे यांना जोराची धडक दिली. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. यानंतर भक्तांनी तत्काळ मदतीसाठी वाहन आणले. मात्र, वाहनात बसण्यास जैन मुनींनी नम्रपणे नकार दिला. त्यामुळे स्ट्रेचरवर सौम्यसागर मुनी यांना जिंतूरला नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्यासह सेवेकरी संकेत मोहारे यांची प्रकृती स्थिर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.