रायरंगपूर (झारखंड), 27 फेब्रुवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत बलात्काराच्याही घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर दोन मुलांची आई असलेली एक विवाहित महिला आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. या महिलेची इन्स्टाग्रामवर एका तरुणासोबत ओळख झाली. पुढे ओळखीचं रुपांतर प्रेमात झाले. याप्रकरणी संबंधित महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार दिली आहे. झारखंडमधील या घटनेने खळबळ उडाली आहे. या महिलेचे 15 वर्षांपूर्वी रायरंगपूर येथील एका व्यक्तीशी लग्न झाले आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणाच्या प्रेमात पडली. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली. संपत्तीचा वाद अन् मुलीवर वाईट नजर, पत्नीने पतीसह दोन्ही मुलांचा विषयच संपवला मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवर महिलेची गालूडीहच्या पायरागुड़ी येथील रहिवासी गोपेश्वर भगतसोबत ओळख झाली. हळूहळू दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. नेहमीच्या संवादानंतर ते दोन्ही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनी पळून जायचे ठरवत त्यानुसार, बेत आखला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. दरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. शुक्रवारी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून महिला आणि तिचा प्रियकर पोलीस ठाणे आले. तेथे दोघांचे नातेवाईकही हजर होते. पतीने पत्नीवर एक लाख रुपये रोख आणि दोन लाखांचे दागिने घेऊन फरार झाल्याचा आरोप केला. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.