मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अहमदनगर जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी 4 जणांना अटक, वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश

अहमदनगर जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी 4 जणांना अटक, वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश

 आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिका यांचा समावेश आहे.

आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिका यांचा समावेश आहे.

आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिका यांचा समावेश आहे.

  • Published by:  sachin Salve

अहमदनगर, 09 नोव्हेंबर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील ( Ahmednagar district hospital fire case) अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी अखेर पोलिसांनी (police ) कारवाई केली आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात आज सायंकाळी चार जणांना अटक (4 arrested ) करण्यात आली. आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिका यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे. यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे, तर शेख आणि आनंत यांचा सेवा समाप्ती करण्याचा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा आदेश आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Ola E-Scooter: फॅक्ट्रीमध्ये कशी बनते ओला ई-स्कूटर, पाहा VIDEO

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटनांनी परिचारिकांना या गुन्ह्यात अटक केल्यामुळे निषेध नोंदवला असून ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे. यामधील प्रमुख सुत्रधाराला अटक करण्याची मागणी केली आहे. शनिवारी (६ नोव्हेंबर) जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागाला आग लागली आहे. या दुर्घटनेत ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी स्वतः ही सोमवारी ही माहिती दिली होती. त्यातच आज, मंगळवारी तोफखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Market : शेअर बाजारात आज घसरण; उद्या कशी असेल बाजाराची दिशा?

यामध्ये चार आरोपींना अटक केली आहे. सदरच्या अटकेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत त्यांच्या भोवतीचा फास आवळला जात आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके करीत आहेत.

First published: