मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोरोनानंतरच भयावह दृश्य, बुलडाण्यात आई-वडिलांचा मृत्यूमुळे 34 मुले झाली पोरकी

कोरोनानंतरच भयावह दृश्य, बुलडाण्यात आई-वडिलांचा मृत्यूमुळे 34 मुले झाली पोरकी

अनाथ झालेल्या बालकांना परस्पर कोणीही दत्तक घेऊ नये किंवा कोणीही देऊ नये.

अनाथ झालेल्या बालकांना परस्पर कोणीही दत्तक घेऊ नये किंवा कोणीही देऊ नये.

अनाथ झालेल्या बालकांना परस्पर कोणीही दत्तक घेऊ नये किंवा कोणीही देऊ नये.

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 03 जून: देशभरात कोरोनाने (Corona) हाहाकार माजवला आहे. त्यामुळे कोरोनामुळे पालकांचा मृत्यू होऊन अनाथ झालेल्या बालकांची संख्या भीषण अशीच आहे. बुलडाणा (Buldhana) जिल्हा बाल संरक्षण समितीने शोध घेणे सुरू केले असून यामध्ये जिल्ह्यात 34 मुलांचे पालकत्व हरवल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी 17 मुले व 17 मुली असून 4 मुला-मुलींचे आई-वडील या दोघांचा मृत्यू झाला असून हे चार मुले पूर्णता पोरकी झाली आहेत, तर 30 मुला-मुलींच्या एका पालकाचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे मृत्यू होऊन अनाथ झालेल्या बालकांचा प्रशासनाने शोध मोहीम सुरू केली असून यासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे, अनाथ झालेल्या या सर्व मुलांना बाल हक्क संरक्षण समिती व बालकल्याण समितीमार्फत त्यांचे माध्यमातून त्यांचे शिक्षण, संगोपन आणि आर्थिक गरजा भागवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करणार आहे,.

दिल्ली पोलिसांना धक्का, सुशील कुमारबाबत कोर्टानं फेटाळली मागणी

त्याचबरोबर अनाथ झालेल्या बालकांना परस्पर कोणीही दत्तक घेऊ नये किंवा कोणीही देऊ नये. अश्या मुलांची माहिती देण्यासाठी बाल संरक्षण समिती अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असं आवाहन प्रशासनाने केले आहे.

धोनी किंवा विराट नाही तर 'या' खेळाडूसारखी बॅटींग करण्याची आहे गावसकरांची इच्छा

तसंच, मुलांना दत्तक घेण्यासंदर्भात सोशल माध्यमांवर अशा भावनिक पोस्ट व्हायरल होत असल्याने त्यावर विश्वास ठेवू नये प्रशासनाला परस्पर माहिती न देता अनाथ मुलामुलींना दत्तक घेतल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले आहे.

First published: