मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गणरायाच्या आगमनाआधीच घेतला जगाचा निरोप; डेकोरेशन करत असतानाच तरुणाचा मृत्यू

गणरायाच्या आगमनाआधीच घेतला जगाचा निरोप; डेकोरेशन करत असतानाच तरुणाचा मृत्यू

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

गणरायाच्या आगमनाच्या आधी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील आयनी गावात मोठी दुर्घटना घडली. गणरायाच्या आगमनाच्या पूर्वतयारीला डेकोरेशन करत असताना आयनी घागुर्डेवाडी येथील 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ratnagiri, India

रत्नागिरी 01 सप्टेंबर : महाराष्ट्रात गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. हा कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे. त्यामुळे यादिवशी कोकणात सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. मात्र गणरायाच्या आगमनाच्या आदल्या रात्री रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील आयनी गावात मोठी दुर्घटना घडली. गणरायाच्या आगमनाच्या पूर्वतयारीला डेकोरेशन करत असताना आयनी घागुर्डेवाडी येथील 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

पुणे : नशेत इमारतीच्या खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न, चौथ्या मजल्याहून कोसळून मृत्यू, विचलित करणारं दृश्य

रुपेश रघुनाथ जाधव याला सजावट करत असताना विजेचा शॉक लागला, यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी आणि घरातल्या लोकांनी त्याला लोटे येथील परशुराम रुग्णालय या ठिकाणी तात्काळ उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यानच तीस वर्षीय रुपेश जाधवने अखेरचा श्वास घेतला. रुपेशच्या मृत्यूमुळे गावावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.

याबाबत खेड पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. गणरायाच्या आगमनाआधी आयनी गावामध्ये जय्यत तयारी सुरू होती. रुपेशही बाप्पाच्या स्वागतासाठी सजावट करण्याच्या कामात व्यस्त होता. मात्र, बाप्पाच्या स्वागताआधीच त्याने या जगाचा निरोप घेतला.

मुलं-बायकांनी भरलेली बोट उलटली, दुर्घटनेचा थरारक LIVE व्हिडीओ आला समोर

डेकोरेशन करत असताना अचानक त्याला विजेचा शॉक लागला. यानंतर गंभीर अवस्थेतच रुपेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना 30 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली. मात्र, उपचारादरम्यानच रुपशेचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे

First published:

Tags: Ganesh chaturthi, Shocking news