गाझिपूर : मुलं आणि बायकांनी खचून भरलेली बोट अचानक नदीमध्ये उलटली. या दुर्घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आपल्या जनावरांना चारा घेऊन जात असताना भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. या बोटीत जवळपास 25 लोक असल्याचं सांगितलं जात आहे. उत्तर प्रदेशातील गाझिपूर इथे नदीमध्ये बोट उलटली. गंगा नदीत ही बोट उलटल्याची माहिती मिळाली आहे. या भीषण अपघातात बोटीतील 7 जण वाहून गेले. रेवतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही दुर्घटना घडली. गंगा नदीच्या पुरात बुडालेल्या 2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर पाण्यात बुडालेल्या 5 मुलांचा अद्याप शोध सुरू आहे. बोटीतील लोक जनावरांसाठी चारा घेऊन जात होते, त्याच दरम्यान बॅलन्स बिघडल्याने बोट बुडाल्याचं सांगण्यात आलं आहे. हे वाचा- आंघोळीसाठी थांबणे जीवावर बेतले, मित्राला वाचवताना दुसरा मित्रही गेला वाहून
लोकांनी भरलेली बोट नदीत उलटली, दुर्घटनेचा थरारक LIVE व्हिडीओ आला समोर pic.twitter.com/OsaMaCEd5m
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) September 1, 2022
हे वाचा- Ambulance Accident : जीव वाचवण्यासाठी ह्रदय घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचाच अपघात पुढे जे घडलं ते… ग्रामस्थांनी बुडणाऱ्या 12 लोकांना वाचवलं आहे. तर अजून बेपत्ता लोकांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी यमुना नदीमध्ये बोट बुडून दुर्घटना घडली होती. आता ही दुसरी घटना समोर आली आहे.