मुंब्रा, 28 डिसेंबर: मुंबईतील मुंब्रा परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. भीषण अपघातात (Terrible road accident) पती-पत्नीसह मेहुण्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऐन लग्नाच्या वाढदिवशी एकाच घरातील तिघांचा (3 member of same family died) अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. ही घटना रविवारी रात्री घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामविरमा परिहार आणि मिनू परिहार असं मृत पावलेल्या जोडप्याचं नाव असून मेहुणा हेमराज भाटी यांचंही या अपघात निधन झालं आहे. रविवारी 26 डिसेंबर रोजी मृत रामविरमा आणि मिनू यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. लग्नाचा वाढदिवस असल्यानं हे जोडपं आनंदात होतं. त्यामुळे लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी (Went to celebrate marriage anniversary) आणि जेवणासाठी मृत रामविरामा आपल्या पत्नीला आणि मेहुण्याला घेऊन भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये गेले होते.
हेही वाचा-महिलेच्या पायांना स्पर्श करणं हाही विनयभंगच, मुंबई HC चा महत्त्वपूर्ण निकाल
तिघेही जण एकाच दुचाकीवर गेले होता. भिवंडीतील हॉटेलमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर, तिघांनी हॉटेलमध्ये जेवण केलं. रात्री उशिरा तिघेही एकाच दुचाकीने आपल्या घरी परतत होते. दरम्यान दुचाकीला अचानक ब्रेक लागल्याने तिघेही पुढे असलेल्या एका चारचाकी वाहनाला जाऊन धडकले. याच वेळी पाठीमागून सुसाट वेगाने आलेल्या कारने तिघांना जोरदार धडक दिली.
हेही वाचा-ख्रिसमससाठी GFला भेटायला गेला अन् जाळ्यात अडकला; गावकऱ्यांचं कृत्य वाचून हादराल
ही धडक इतकी भयावह होती की, तिघेही रस्त्यावर उडून पडले. यामध्ये रामविरामा आणि मेहुणे हेमराज भाटी यांचा जागीच मृत्यू झाला. तर मिनू यांनी ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. लग्नाच्या वाढदिवशी तिघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Road accident