मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लहान मुलांकडे लक्ष द्या! आई पाणी भरत असताना 3 वर्षांच्या शिवमने...

लहान मुलांकडे लक्ष द्या! आई पाणी भरत असताना 3 वर्षांच्या शिवमने...


नांदेड शहरातील कंधार तालुक्यातील कौठा इथं ही घटना घडली आहे.  मुंडकर दाम्पत्याचा शिवम हा एकुलता एक मुलगा होता.

नांदेड शहरातील कंधार तालुक्यातील कौठा इथं ही घटना घडली आहे. मुंडकर दाम्पत्याचा शिवम हा एकुलता एक मुलगा होता.

नांदेड शहरातील कंधार तालुक्यातील कौठा इथं ही घटना घडली आहे. मुंडकर दाम्पत्याचा शिवम हा एकुलता एक मुलगा होता.

  • Published by:  sachin Salve
मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड, 17 जून : लहान मुलं जर घरात किंवा इतर कुठे खेळत असतील त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. जर थोडे जरी दुर्लक्ष झाले तर मोठा अनर्थ घडू शकतो. अशीच एक घटना नांदेडमध्ये घडली आहे. 3 वर्षांच्या शिवम मुंडकर या चिमुरड्याचा  विजेच्या धक्क्याने करूण अंत झालं आहे. नांदेड शहरातील कंधार तालुक्यातील कौठा इथं ही घटना घडली आहे.  या परिसरात राहणाऱ्या मुंडकर यांच्या घरी सकाळी पाणी भरण्याचे काम सुरू होते.   तेव्हा आई आणि शेजारच्या महिला नळाची मोटार लावून पाणी भरत होते. त्यावेळी शिवम हा घरात खेळत होता. गलवान खोऱ्यात चीनशी दोन हात करताना आलं वीरमरण; 20 शहीदांची नावं जाहीर घरातून मोटरला लावलेल्या वायरमध्ये एका ठिकाणी तुटलेला होता. त्यामुळे त्याला चिकट टेप लावली होती. शिवमने खेळता खेळता वायरला ज्या ठिकाणी कट पडला होता तिथे लावलेली चिकट टेप काढली आणि वायर दोन्ही हातात धरला. त्यामुळे त्याला जोराचा विजेचा धक्का बसला आणि  जागी मृत्यू झाला. शिवमने वायर पकडला असल्याचं लक्षात येता आईने धाव घेऊन वीज प्रवाह बंद केला. पण, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. नातेवाईकांनी शिवमला तातडीने  खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मोठी बातमी! अखेर MPSCनं जाहीर केलं नवं वेळापत्रक, या तारखेला होणार पूर्व परीक्षा मृत शिवमचे वडील शिवकुमार मुंडकर हे एका दुकानात  मुनीम म्हणून काम करतात. मुंडकर दाम्पत्याचा शिवम हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या निधनामुळे मुंडकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.  संपादन - सचिन साळवे
First published:

Tags: नांदेड

पुढील बातम्या