मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Big News : पंजाबमधील 3 कुख्यात गँगस्टरांच्या आवळल्या मुसक्या; कल्याणमध्ये पोलिसांची मोठी कारवाई

Big News : पंजाबमधील 3 कुख्यात गँगस्टरांच्या आवळल्या मुसक्या; कल्याणमध्ये पोलिसांची मोठी कारवाई

कल्याण येथून मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

कल्याण येथून मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

कल्याण येथून मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali), India

ठाणे, 9 जानेवारी : कल्याणमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत पंजाबमधील 3 गँगस्टरना पकडण्यात आले आहे. कल्याणच्या मोहने परिसरातून या तिघांना ताब्यात घेण्यात आले. मुंबई एटीएस, ठाणे एटीएस, नवी मुंबई एटीएस आणि कल्याण खडकपाडा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.

शिवम उर्फ महालोन अवतार सिंग, गुरुमुख सिंग उर्फ गोरा नरेश कुमार आणि अमनदीप कुमार उर्फ गुरमीलचंद अशी या तिघांची नावे आहेत. पंजाबमधील एका हत्येच्या प्रकरणातील हे गँगस्टर होते. मागील काही महिन्यांपासून ते फरार होते. कल्याणमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत या पंजाबमधील 3 गँगस्टरच्या मुसक्या आवळल्या.

हेही वाचा - औरंगाबादेत बलात्काराचे सत्र सुरुच; दोन विवाहित महिलानंतर सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार

भिवंडीत बोलायचंय तृतीयपंथीयासोबत धक्कादायक कृत्य - 

भिवंडी शहरातील आझाद नगर येथे एका खोलीत नेऊन बेदम मारहाण करत दोघा नराधमांनी 19 वर्षीय तृतीयपंथीयांवर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात दोघा नराधमांवर अनैसर्गिक अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहाल सलीम खान (वय 23) आणि शाहिद (वय 25) असे गुन्हा दाखल झालेल्या नरधमांची नावे आहेत. तसेच या नराधमांना लवकरात लवकर जर अटक केली नाही तर किन्नर अस्मिता संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

First published:

Tags: ATS, Crime news, Kalyan, Mumbai police